शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गासाठी १८ कंपन्यांच्या निविदा पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 23:35 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी ४६ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

मुंबई : नागपूर-मुंबई महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या बांधकाम प्रक्रियेसाठी एकूण १८ कंपन्या पात्र ठरल्या आहेत. ७०० किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या १३ पॅकेजेसच्या बांधकामासाठी मागविण्यात आलेल्या कंत्राटदारांच्या वित्तीय निविदा आज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे खुल्या करण्यात आल्या. यात बांधकाम प्रक्रियेसाठी १८ कंपन्या पात्र ठरल्या आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी ४६ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. दहा जिल्हे, २६ तालुके आणि ३९२गावांना जोडणाऱ्या या समृद्धी महामार्गामुळे कृषी, औद्योगिक, आरोग्य, शिक्षण, बांधकाम, पर्यटन आदी क्षेत्रांना चालना मिळणार आहे. नागपूर आणि मुंबई या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळही या महामागार्मुळे निम्म्यावर येणार आहे. मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा हा महामार्ग भविष्यात राज्याच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय रस्ता परिषदेच्या (आयआरसी) नियमांनुसार या महामागार्ची उभारणी करण्यात येणार आहे. एकूण १६ पॅकेजेसमध्ये या प्रस्तावित महामार्गाचे विभाजन करण्यात आले असून त्यातील १३ पॅकेजेससाठी अर्हताप्राप्त कंत्राटदारांकडून वित्तीय निविदा मागविण्यात आल्या होत्या. उर्वरित तीन पॅकेजेससाठीही वित्तीय निविदांचे काम प्रगतिपथावर आहे.एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार म्हणाले की, वित्तीय निविदा खुल्या करण्याच्या या प्रक्रियेच्या माध्यमातून प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. निविदा प्रक्रियेदरम्यान पात्र ठरलेल्या कंपन्या पुढीलप्रमाणे : मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रा लि., एनसीसी लि., टीपीएल सेंगिझ जेव्ही, एल अँड टी लि., सद्भाव इंजिनीअरिंग लि., रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, पीएनसी इन्फ्राटेक लि., अ‍ॅफकाँन इन्फ्रास्ट्रक्चर लि., बीएससीपीएल जीव्हीपीआर जे/व्ही, नवयुग इंजिनीअरिंग कं. लि., अ‍ॅप्को इन्फ्राटेक प्रा. लि., आयएलएफएस ट्रान्सपायरेशन नेटवर्क लि., केएनआर कन्स्ट्रकन्स लि., दिलीप बिल्डकाँन लि., माँटेकार्लो लि., आयर्न टिंगल लि., अशोका बिल्डकाँन लि., गायत्री प्रोजेक्ट्स लि., ओरिएंटल स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग प्रा. लि. 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग