शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

इंडियन आॅईलची १ कोटी ८० लाखाची निविदा वांध्यात

By admin | Updated: August 11, 2014 00:52 IST

इंडियन आॅईल कॉर्पोरेशन कंपनीची १ कोटी ८० लाख रुपयांची निविदा वांध्यात सापडली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निविदेचा कार्यादेश जारी करण्यास मनाई केली आहे.

हायकोर्ट : कार्यादेश जारी करण्यास मनाईनागपूर : इंडियन आॅईल कॉर्पोरेशन कंपनीची १ कोटी ८० लाख रुपयांची निविदा वांध्यात सापडली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निविदेचा कार्यादेश जारी करण्यास मनाई केली आहे.इंडियन आॅईलने उत्तर प्रदेशात ‘सोप सोल्युशन’ खरेदीसाठी गेल्या १० जुलै रोजी निविदा काढली. निविदेत सहभागी होण्यासाठी जाचक अटी ठेवण्यात आल्यामुळे, काटोल येथील सूक्ष्म उद्योगाचे मालक दिनेश भुतडा यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांनी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर कंपनीला निविदा प्रक्रिया पूर्ण करा, पण पूर्वपरवानगीशिवाय कार्यादेश जारी करू नका, असे निर्देश दिले. तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे सचिव आणि इंडियन आॅईल कंपनी यांना नोटीस बजावली. प्रतिवादींना उत्तर सादर करण्यासाठी १८ आॅगस्टपर्यंत वेळ देण्यात आला आहे.इंडियन आॅईलने निविदा काढताना केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग मंत्रालयाचे निर्देश आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग कायद्यातील कलम ११ अंतर्गत निर्धारित सार्वजनिक खरेदी धोरणाचे पालन केले नाही. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी सूक्ष्म व लघु उद्योगांना सार्वजनिक खरेदीमध्ये २० टक्के आरक्षण देणे, सूक्ष्म व लघु उद्योगांकडून खरेदीचे वार्षिक लक्ष्य निश्चित करणे, लक्ष्य पूर्ण झाले नाही तर अपयशासंदर्भात कारणांसह स्पष्टीकरण सादर करणे इत्यादी महत्त्वपूर्ण बाबींचा धोरणात समावेश आहे. परंतु इंडियन आॅईल कंपनीने या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केलेले नाही. ‘सोप सोल्युशन’ उत्पादन सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी राखीव आहे. परिणामी निविदेत वार्षिक उलाढाल व अनुभवासंदर्भात जाचक अटी ठेवणे अवैध असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. तुषार मंडलेकर, तर केंद्र शासनातर्फे एएसजीआय अ‍ॅड. रोहित देव यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)