शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

बीपीटीच्या जागेवरील भाडेकरूंची निदर्शने

By admin | Updated: April 5, 2017 02:41 IST

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवरील भाडेकरूंना घरे खाली करण्याची नोटीस दिल्याविरोधात शेकडो भाडेकरूंनी मंगळवारी आझाद मैदानात निदर्शने केली

मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवरील भाडेकरूंना घरे खाली करण्याची नोटीस दिल्याविरोधात शेकडो भाडेकरूंनी मंगळवारी आझाद मैदानात निदर्शने केली. मुंबई पोर्ट ट्रस्टने कारवाईला स्थगिती देऊन राज्य शासनाने भाडेकरूंना दिलासा द्यावा, अशी मागणी संबंधित भाडेकरूंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.भाडे नियंत्रण कायद्याच्या आधारे बीपीटी, एलआयसी आणि इतर सहकारी क्षेत्रीय संस्थांच्या जमिनीवरील भाडेकरूंना त्रास दिला जात असल्याचा आरोप सुबोध सप्रे यांनी केला. सप्रे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत संबंधित प्रशासने भाडेकरूंना घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावत आहेत. याआधीच सर्वोच्च न्यायालयाने २००६ साली भाडेकरू आणि प्रशासनाला तडजोडीचे सूत्र सांगितलेले आहे. या सूत्रानुसार २ हजार ३०० भाडेकरूंना दिलासा मिळणार आहे. या सूत्राची अंमलबजावणी करण्यासाठी सुमारे ४०० भाडेकरूंनी याआधीच ठरलेली रक्कम प्रशासनाकडे जमा केली आहे. मात्र तरीही गेल्या १० वर्षांत केवळ ६ भाडेकरूंनाच प्रशासनाने दिलासा दिलेला आहे. त्यामुळे संबंधित जागेवरून भाडेकरूंना हाकलून देण्याचा प्रशासनाचा डाव दिसत असल्याचा आरोपही सप्रे यांनी केला.याआधी काँग्रेसचे दिवंगत नेते मुरली देवरा असताना भाडेकरू आणि प्रशासनामध्ये मध्यस्थीची भूमिका बजावत होते. काही ठिकाणी तर पोलीस बलाचा वापर करून भाडेकरूंना बळजबरीने घरे खाली करण्यास सरकारने भाग पडल्याचा आरोप माजी नगरसेवक विनोद शेखर यांनी केला. (प्रतिनिधी)