शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भाडेकरूनेच केली मालकिणींची हत्या

By admin | Updated: June 25, 2016 01:42 IST

कल्याण पूर्वेतील खडेगोळवली येथील दूधकर निवासमधील दोन वयोवृद्ध महिलांची त्यांच्याच भाडेकरूने हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे

डोंबिवली : कल्याण पूर्वेतील खडेगोळवली येथील दूधकर निवासमधील दोन वयोवृद्ध महिलांची त्यांच्याच भाडेकरूने हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. नंदकुमार प्रसाद असे आरोपीचे नाव आहे. त्याला कोळसेवाडी पोलीस आणि कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेने हत्याकांडानंतर अवघ्या सहा दिवसांत बिहारमध्ये सापळा रचून अटक केली आहे. दरम्यान, त्याला शनिवारी कल्याण येथे आणण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.खडेगोळवली परिसरातील गावदेवी मंदिरानजीक असलेल्या दूधकर निवास येथे राहणाऱ्या लीलाबाई दूधकर (६०) व कमलाबाई दूधकर (७०) या नणंद-भावजयांची शनिवारी रात्री डोक्यात काठीने प्रहार करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर घरातील दोन कॅमेरे, सात तोळे दागिने व १० हजार रुपये घेऊन मारेकरी पसार झाला होता. कोळसेवाडी पोलिसांनी याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. घटनास्थळी पाहणी केली असता, ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाल्याचा पोलिसांचा संशय होता. त्याचबरोबर दूधकर यांचा भाडेकरू प्रसाद बेपत्ता झाला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर संशय व्यक्त करत त्या दृष्टीने तपास सुरू केला. त्यासाठी कोळसेवाडी पोलीस व कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर, सहायक पोलीस निरीक्षक विजय खेडेकर यांच्या पथकाने माग काढत बिहार राज्यातील सुलतानपूर गावात सापळा रचून त्याला अटक केली. दूधकर नणंद-भावजय यांची आर्थिक परिस्थिती प्रसाद याला माहीत होती. या दोघींच्या घरात दागिने, पैसा अडका मिळेल, अशी आशा त्याला होती. त्यासाठी त्याने त्यांची हत्या करून चोरी करण्याचा कट रचला. शनिवारच्या पहाटे यातील एक महिला शौचास बाहेर गेली असताना त्याने घरातील महिलेच्या डोक्यात काठीने प्रहार केला. त्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर शौचावरून आलेल्या दुसऱ्या महिलेलाही त्याच पद्धतीने ठार मारले. घरातील किमती ऐवज घेऊन तेथून नंदकुमार पसार झाला होता.