शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षांची निवडणूकबंदी कायम

By admin | Updated: January 30, 2016 01:51 IST

रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने ज्या सहकारी बँकांवर २००६ पासून प्रशासक नेमण्यात आले आहेत, त्या बँकांच्या संचालक मंडळाला पुढील दहा वर्षे सहकारी बँकांच्या निवडणूक लढवण्यास राज्य

मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने ज्या सहकारी बँकांवर २००६ पासून प्रशासक नेमण्यात आले आहेत, त्या बँकांच्या संचालक मंडळाला पुढील दहा वर्षे सहकारी बँकांच्या निवडणूक लढवण्यास राज्य सरकारने बंदी घातली आहे. या संदर्भातील वटहुकूम २१ जानेवारी रोजी काढला आहे. या वटहुकूमाला विविध बँकांच्या संचालक मंडळांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. शुक्रवारच्या सुनावणीवेळी हायकोर्टाने वटहुकूमास स्थगिती देण्यास नकार दिला.रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार बरखास्त करण्यात आलेल्या राज्य सहकारी बँका व जिल्हा सहाकारी बँकेतील तत्कालीन संचालकांना पुढची दहा वर्षे कोणत्याही सहकारी बँकेची निवडणूक लढविण्यास बंदी घालणारा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने ५ जानेवारी घेवून २१ जानेवारी रोजी वटहुकूमही काढला. या वटहुकूमाला पांडुरंग शिंदे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे होती. ‘राज्य सरकारने मनमानीपणा करत हा वटहुकूम काढला आहे. वटहुकूम २१ जानेवारी २०१६ रोजी काढला आहे. त्यामुळे तो पूर्वलक्षी प्रभावाने कसा लागू केला जाऊ शकतो?’ अशी प्रश्न याचिकाकर्त्यांनी याचिकेद्वारे उपस्थित केला आहे.‘सरकार जनहितार्थासाठी काही कायदे पूर्वलक्षी प्रभावाने लागू करू शकते. यापूर्वीही काही कायदे पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आले आहेत. बँकेला डबघाईला आणणारे संचालक मंडळ अन्य बँकेच्या निवडणुका लढवून अन्य बँकांचीही तिच परिस्थिती करतील. त्यामुळे सहकारी बँका स्थापण्याचा उद्देश निष्फळ ठरेल,’ असा युक्तिवाद मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी खंडपीठापुढे केला.या संदर्भात वटहुकूम काढण्यात आला असून उच्च न्यायालय यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. बँका डबघाईला आणणाऱ्या संचालकांना निवडणूक लढवण्यास बंदी घालणाऱ्या सहकार कायद्याच्या नव्या तरतूदीस स्थगिती दिल्यास कायद्यालाच स्थगिती दिल्यासारखे होईल. या कायद्यांतर्गत तत्कालीन संचालक मंडळाला निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले तर त्यांना अन्य कायदेशीर पर्याय उपलब्ध आहे. मात्र यासाठी कायद्याला स्थगिती देण्याची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद अ‍ॅड. वग्यानी यांनी केला. खंडपीठाने सरकारचा युक्तिवाद ग्राह्य धरत यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार देत वटहुकूमाला स्थगिती देण्यास नकार दिला. राज्य सरकारला या याचिकेवर येत्या दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)