शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

औदुंबरच्या गोशाळेत दहा हजार इको फ्रेंडली गणेशमूर्ती

By admin | Updated: June 11, 2017 18:21 IST

औदुंबर (ता. पलूस) येथील गोपालनंदन गो शाळेमधून यंदाच्या गणेशोत्सवासाठी देशी गाईच्या शेणापासून बनविलेल्या इको फ्रेंडली

 शरद जाधव/ऑनलाइन लोकमत    सांगली, दि. 11 - औदुंबर (ता. पलूस) येथील गोपालनंदन गो शाळेमधून यंदाच्या गणेशोत्सवासाठी देशी गाईच्या शेणापासून बनविलेल्या इको फ्रेंडली गणेश मूर्तींचे वितरण केले जाणार आहे. या दहा हजारांवर गणेशमूर्ती गुजरातमधून आणण्यात आल्याची माहिती गोपालनंदन गोशाळेचे प्रमुख सुहास पाटील यांनी दिली.पर्यावरण रक्षणाबरोबरच, शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि गाई वाचविण्यासाठी टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जाते. प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी पर्याय म्हणून शाडूच्या किंवा मातीच्या गणेशमूर्ती बनविल्या जातात; पण यासाठी उपलब्ध साधनसामग्री, बनविण्यासाठी लागणारा वेळ व येणार खर्च, या सर्व बाबी कलाकार आणि भाविकांना न परवडणाऱ्या आहेत. मात्र या सर्वांना एक चांगला पर्याय शोधला आहे, तो गुजरात राज्यातील देवीमाँ गोमाई ग्रामीण महिला उद्योग, कियाडा (जि. राजकोट) या संस्थेने. भारतीय वंशाच्या देशी गाईच्या शेणाचा वापर करून मोठ्या कल्पकतेने गणेश मूर्ती बनविल्या आहेत. वजनाला हलक्या, सहज हाताळता येतील अशा व आपणास पाहिजे तशा रंगविता येतील, अशा मूर्ती बनविल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली. तीन इंचापासून तीन फुटापर्यंत विविध आकारात या मूर्ती तयार केल्या असून, विसर्जन केल्यानंतर त्या लगेचच विरघळतात. गाईचे शेण पाण्यात विरघळल्यानंतर पाणी स्वच्छ करीत असल्याने जलप्रदूषणही होणार नाही. पर्यावरणाच्या रक्षणासाठी दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे. गोसेवा म्हणून नाममात्र मूल्य आकारून या इकोफ्रेंडली गणेश मूर्तींचे राज्यभर वितरण करण्यात येणार आहे. गेली पाच वर्षे हा प्रयोग सुरू असून, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लता मंगेशकर आदींसह विविध मान्यवरांना या मूर्ती भेट दिल्या असून, त्यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे.गोबर क्रांतीमुळे गार्इंचे पालनपोषण शक्यभाकड गार्इंचे पालनपोषण करणे शेतकऱ्यांना परवडत नाही, म्हणून गार्इंची रवानगी नाईलाजास्तव कत्तलखान्यात केली जाते. गुजरातमध्ये गाईचे शेण पन्नास रुपये प्रतिकिलो दराने विकत घेऊन इको फ्रेंडली गणेशमूर्ती घडविल्या जातात. भविष्यात विविध शोभेच्या वस्तू बनवून देशभर त्या वितरित करण्याचे नियोजन आहे. यामुळे शेतकरी व महिला बचतगटांना आर्थिक फायदा मिळेलच, शिवाय दुधापेक्षाही शेणाला दर मिळाल्याने गार्इंचा सांभाळही होईल.- सुहास पाटीलगोपालनंदन गोशाळा