शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

छबू नागरेसह दहा संशयितांच्या पोलीस कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2016 21:04 IST

बनावट नोटा छापल्याप्रकरणी राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी छबू नागरेसह दहा संशयितांना जिल्हा व सत्र न्यायालयाने पुन्हा चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 29 - बनावट नोटा छापल्याप्रकरणी राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी छबू नागरेसह दहा संशयितांना जिल्हा व सत्र न्यायालयाने पुन्हा चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.  पुणे आयकर विभाग युनिट एक व आडगाव पोलिसांनी गुरुवारी (दि़ २२) मध्यरात्री मुंबई-आग्रा महामार्गावर सापळा रचून ११ संशयितांकडून १़३५ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयितांमध्ये नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी छबू नागरे, महापालिकेचा माजी घंटागाडी ठेकेदार रामराव पाटील व सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रमेश पांगारकर यांच्यासह आदी संशयितांना न्यायालयाने २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. सात दिवसांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर या सर्व संशयितांना पोलिसांनी गुरुवारी (दि.२९) जिल्ह्यात न्यायालयात हजर केले. यावेळी सरकारी वकील अ‍ॅड. सुनीता चिताळकर यांनी बाजू मांडत गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी तसेच गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. यावेळी तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी संशयित आरोपींची संख्या जास्त असल्यामुळे तपासात अडचणी निर्माण होत असून, संशयितांकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तसेच काही संशयितांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हेदेखील दाखल असून, यांची साखळी, मोठी टोळी या बनावट नोटा छापण्याच्या गुन्ह्यामागे असू शकते असे न्यायालयापुढे सांगितले. यावेळी संशयितांच्या वकिलांनीही पोलीस कोठडी देण्याची गरज नसल्याचा युक्तिवाद केला. न्यायाधीश डिंपल देढीया यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकत अकरा संशयितांच्या पोलीस कोठडीत येत्या २ जानेवारीपर्यंत वाढ केली.