शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दहा जणांना सुखरूप वाचविले; दोघांचा शोध सुरू

By admin | Updated: July 12, 2016 15:31 IST

देसाईगंज तालुक्याच्या सावंगी गावाकडे येताना नाव उलटल्याने १२ जण वैनगंगेत बुडाल्याची घटना मंगळवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

ऑनलाइन लोकमत,देसाईगंज (गडचिरोली), दि. 12-  ब्रह्मपुरी तालुक्यातील जुनी लाडज येथून नावेने देसाईगंज तालुक्याच्या सावंगी गावाकडे येताना नाव उलटल्याने १२ जण वैनगंगेत बुडाल्याची घटना मंगळवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. बुडालेल्या १२ नागरिकांपैकी १० जणांना वाचविण्यात प्रशासनाला यश आले असले, तरी दोन जण अद्यापही बेपत्ताच असल्याची माहिती आहे.ब्रम्हपुरी तालुक्यातील लाडज हे गाव चहूबाजूंनी नद्यांनी वेढलेले आहे. दरवर्षी पावसाळयात हे गाव पुराने वेढलेले असते. काही वर्षांपूर्वी या गावांतील काही नागरिकांचे नदीपलिकडील सावंगी गावानजीक पुनर्वसन करण्यात आले. परंतु जमीन सुपीक असल्याने अजूनही बरेचसे कुटुंब जुनी लाडज येथेच वास्तव्य करतात. तेथील नागरिकांना पावसाळ्यात बाहेर पडण्यासाठी नाव (डोंगा) हेच साधन असते.

मंगळवारी सकाळी लाडज येथून काही शाळकरी विद्यार्थ्यांसह १२ जण नावेने सावंगीकडे जाण्यास निघाले. मात्र नाव वैनगंगेच्या मध्यभागी येताच ती उलटली. यामुळे १२ जण पाण्यात बुडाले. काही वेळातच देसाईगंज पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी हजर झाले. पोलीस प्रशासन व मासेमारांच्या सहाय्याने बचावकार्य सुरु करण्यात आले. बुडालेल्या दोघांचा शोध सुरु आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वाचलेल्या नागरिकांची विचारपूस करुन प्रशासनाला योग्य सूचना केल्या.

यावेळी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे आदी उपस्थित होते. या सर्व नागरिकांना सावंगी येथील रुग्णालयात तत्काळ दाखल करण्यात आले. रुग्णालयात जाऊनही आमदार क्रिष्णा गजबे यांनी नागरिकांची भेट घेतली.