शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

दहा लाख चारचाकी गाड्या

By admin | Updated: March 21, 2017 03:44 IST

उड्डाणपूल आणि नवीन द्रुतगती मार्ग उभारूनही मुंबईतील वाहतुकीची समस्या जैसे थे आहे. मुंबईच्या वाहतूककोंडीला वाहनांची वाढती संख्या प्रमुख कारण

मुंबई : उड्डाणपूल आणि नवीन द्रुतगती मार्ग उभारूनही मुंबईतील वाहतुकीची समस्या जैसे थे आहे. मुंबईच्या वाहतूककोंडीला वाहनांची वाढती संख्या प्रमुख कारण आहे. मुंबईतील चारचाकी वाहनांची संख्या १० लाखांवर गेल्याची माहिती राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणातून समोर आली आहे. नुकताच विधिमंडळात राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार राज्यात सर्व प्रकारची एकूण २ कोटी ९० लाख वाहने आहेत. त्यापैकी तब्बल १० टक्के म्हणजे २९ लाख वाहने एकट्या मुंबईत आहेत. त्यातही चारचाकी वाहनांची संख्या लक्षणीय आहे. मुंबईत जानेवारी २०१६पर्यंत नऊ लाख ३० हजार चारचाकी वाहने होती. पण गेल्या एका वर्षात यात ९.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ताज्या सर्वेक्षणानुसार मुंबईत सध्या १० लाख २७ हजार चारचाकी वाहने आहेत. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे रस्त्यांवरील ताण दिवसेंदिवस वाढतच आहे. एकीकडे वाहनांची संख्या वाढत असली, तरी ती वाहून नेण्यासाठी रस्त्यांची लांबी मात्र ठरावीक मर्यादेबाहेर वाढविणे शक्य नाही. मुंबईत आजही फक्त दोन हजार किलोमीटर लांबीचेच रस्ते आहेत. वाहनांची संख्या आणि रस्त्यांच्या लांबीबाबत असणाऱ्या या व्यस्त समीकरणामुळे वाहनांच्या बाबतीत मुंबई देशातील सर्वाधिक घनतेचे महानगर ठरले आहे. मुंबईत प्रति शंभर मीटर १४१ वाहने उभी राहू शकतात. तर नागपूरमध्ये हाच आकडा फक्त ३६ आहे. नागपूरपाठोपाठ ठाण्यात ३३ तर पुण्यात २६ वाहने उभी राहतात. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईत पार्किंगसाठीही जागा उरलेली नाही. अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी सोसायटीबाहेरील पदपथांवरच वाहने उभी केली जातात. (प्रतिनिधी)एकीकृत वाहतूक व्यवस्थेचाच पर्याय -प्रचंड गर्दीमुळे बेस्ट बसेस आणि लोकल गाड्यांचा प्रवास जिकिरीचा ठरतो. संख्या आणि सुविधेच्या बाबतीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नकोशी झाल्यानेच अनेक जण खासगी वाहनांचा पर्याय निवडतात. त्यामुळे रस्त्यांवरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. हा ताण कमी करण्यासाठी सुखकर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याचा मागणी तज्ज्ञांनी लावून धरली आहे. मेट्रो आणि मोनो प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता असून, सर्व वाहतूक व्यवस्था एकमेकांशी जोडण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे. मुंबईच्या रस्त्यांवरील ताण कमी करायचा असेल तर एकीकृत वाहतूक व्यवस्थेशिवाय पर्याय नाही.