शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दहा-वीसच्या मळक्या आणि फाटक्या नोटाच सुसाट!

By admin | Updated: November 13, 2016 21:32 IST

ओ दादा... ही नोट फाटलीय, दुसरी द्या..., आमच्याकडनं कोण घेत नाही बघा..., असले संवादच रविवारच्या आठवडा बाजारात ऐकायला मिळाले नाही.

आॅनलाईन लोकमतसातारा, दि. 13 - ओ दादा... ही नोट फाटलीय, दुसरी द्या..., आमच्याकडनं कोण घेत नाही बघा..., असले संवादच रविवारच्या आठवडा बाजारात ऐकायला मिळाले नाही. शेतकरी, व्यापारी अन् ग्राहक शहाण्यासारखं वागत होते. साहेब मळकी, फाटकी नोट असली तरी द्या; पण पाचशे, हजारांची नको. असे शेतकरी म्हणत आहेत.भारतीय चलनातून पाचशे अन् हजारांच्या नोटा मंगळवारी रात्रीपासून अचानक रद्द करण्यात आला. त्यानंतर जिल्ह्यातील सर्वच अर्थकारणावर जबर फटका बसला आहे. पहिल्या दोन-तीन दिवसांत तर अनेकांना चहा, नास्टा करण्यासाठीही अवघड झाले होते. या घटनेला पाच-सहा दिवस झाले तरी अजून फारशी परिस्थितीत बदललेली नाही. पण यातून सातारकर मात्र सावरत आहेत. जुना मोटार स्टॅण्ड परिसरात रविवारच्या बाजारात थेट शेतकरीच माल विकण्यासाठी येतात. त्यातच शाळा-महाविद्यालय, नोकरदारांना साप्ताहिक सुटी असल्याने या बाजारात दर रविवारी तुफान गर्दी असते. ऐतिहासिक या निर्णयानंतर रविवारी प्रथमच आठवडा बाजार भरला होता. दरवेळीसारखी गर्दीच यंदा दिसत नव्हती. सर्वत्र तुरळक ग्राहक दिसत होते. शेतकरी, व्यापारी प्रथमच ग्राहकांकडे सुटे पैसे आहेत ना? अशी विचारणा करत होते. त्यानंतरच पुढील व्यवहार होत होते.कांदा-बटाटा वाल्यांकडं पाचशे चालतेकांदा-बटाटे विक्री करणारे व्यापारीच अधून-मधून एखादा ग्राहक पाचशेची नोट दिली तर ते घेत होते. ग्राहकांनी पाचशेची नोट आहे, असे सांगितले असता पहिला प्रश्न विचारला जायचा. ह्यकिती घेणार?ह्ण मोठा ग्राहक असला तर हे व्यापारी पाचशेची नोट घेत होते. कोणी काही विचारलंच तर कष्टाचा पैसा हाय? त्याला काय घाबरायचं. बँकेत जमा करू की, असे सांगितले जात होते. किरकोळ नोटा आल्या बाहेरपाचशेच्या नोटा रद्द झाल्यानंतर कसं होईल?, असं वाटलं जात होतं. याचा फटका आठवडा बाजाराला बसलाही. पण जे ग्राहक आले त्यातील बहुतांश जणांकडे दहा, वीस, पन्नासच्या नोटा पाहावयास मिळत होत्या. चाळीसची वस्तू वीसला...शेतकऱ्यांनाही आणलेला माल विकायचा होता. त्यातच ग्राहकांची संख्या रोडावलेली. त्यामुळे बहुतांश वस्तूंच्या किमती कमी होत्या. परंतु हुशार ग्राहक त्यातूनही किमती पाडून मागत होते. अशा वेळी ग्राहक सोडण्यापेक्षा चला घ्या... म्हणून माल दिला जात होता.