शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विधी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना तात्पुरता दिलासा

By admin | Updated: February 4, 2017 01:30 IST

विधी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांवर बार कौन्सिल आॅफ इंडियाने (बीसीआय) घातलेल्या वयाच्या अटीवर उच्च न्यायालयाने तात्पुरती दिलेली स्थगिती आणखी काही

मुंबई: विधी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांवर बार कौन्सिल आॅफ इंडियाने (बीसीआय) घातलेल्या वयाच्या अटीवर उच्च न्यायालयाने तात्पुरती दिलेली स्थगिती आणखी काही दिवस कायम केली. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात तात्पुरत्या स्वरुपी प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करू नका, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. सप्टेंबर २०१६ मध्ये बीसीआयने २० वर्षांवरील विद्यार्थ्यांना पाच वर्षांच्या एलएलबी कोर्ससाठी तर ३० वर्षांवरील विद्यार्थ्यांना तीन वर्षांच्या एलएलबी कोर्ससाठी अपात्र ठरवले. त्यामुळे राज्य सरकारनेही या वयोगटातील विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देत बीसीआयच्या निर्णयाच्या अधीन राहून हे प्रवेश अंतिम करण्यात येतील, असे राज्य सरकारने कोर्सच्या माहिती पुस्तकात म्हटले आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी बीसीआयच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली. मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवरील सुनावणी होती.शुक्रवारच्या सुनावणीत याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी अद्याप बीसीआयने नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल प्रलंबित असल्याची माहिती खंडपीठाला दिली. ‘बीसीआयने नेमलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल प्रलंबित आहे. या समितीचे काय म्हणणे आहे, हे समजून घेण्यासाठी थांबावे लागेल,’ असे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले. याचिकाकर्त्यांचे म्हणणे मान्य करत खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी काही आठवडे तहकूब केली.‘त्या वयानंतरचे विद्यार्थी(अट घातलेल्या वयानंतरची) वचनबद्ध नसतात?’ असा प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला होता. बीसीआयने घातलेल्या अटीबाबत वेगवेगळ्या राज्यांच्या उच्च न्यायालयांनी वेगवेगळे निकाल दिले आहेत. अलहाबाद आणि पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने बीसीआयच्या वयोमर्यादेविरुद्ध निकाल दिला आहे. तर मदुराई उच्च न्यायालयाने बीसीआयची वयाची मर्यादा योग्य असल्याचे म्हटले आहे. (प्रतिनिधी) - गेल्या सुनावणीत बीसीआयच्या वकिलांनी वयोमर्यादेबाबत ११० पानी उत्तर खंडपीठासमोर सादर केले. ‘आम्हाला स्थिर विद्यार्थी हवे आहेत. काही विद्यार्थी प्रवेश घेतात आणि मग निघून जातात. त्यामुळे वयोमर्यादेची अट घालण्यात आली आहे,’ असे बीसीआयच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले.