शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

कोल्हापूरच्या सात अपात्र नगरसेवकांना तात्पुरता दिलासा

By admin | Updated: May 17, 2016 03:12 IST

सात नगरसेवकांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या जात पडताळणी समितीच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने सोमवारी २० जूनपर्यंत स्थगिती दिली

मुंबई : कोल्हापूरच्या महापौर अश्विनी रामाणे यांच्यासह सात नगरसेवकांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या जात पडताळणी समितीच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने सोमवारी २० जूनपर्यंत स्थगिती दिली, त्यामुळे या नगरसेवकांना तूर्तास तरी दिलासा मिळाला आहे.काँग्रेसच्या नगरसेवक व कोल्हापूरच्या महापौर अश्विनी रामाणे, महिला व बालकल्याण समिती सभापती वृषाली कदम, डॉ. संदीप नेजदार आणि दीपा मगदूम तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन पाटील, ताराराणी आघाडीचे नीलेश देसाई आणि भाजपाचे संतोष गायकवाड यांचे जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने गेल्या सोमवारी अवैध ठरवले. दुसऱ्या दिवशी तेथील महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी जात पडताळणी समितीच्या आदेशावरून अश्विनी रामाणे यांच्यासह सात नगरसेवकांना अपात्र ठरवले. या सातही नगरसेवकांनी जात पडताळणी समितीच्या व आयुक्तांच्या आदेशाला उच्च न्यायालयाच्या उन्हाळी खंडपीठापुढे आव्हान दिले. या याचिकांवरील सुनावणी न्या. अजय गडकरी व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होती. आयुक्तांनी सुनावणी न घेताच नगरसेवकांना अपात्र ठरवले. आयुक्तांचा हा निर्णय मनमानी आणि बेकायदा आहे, असा युक्तिवाद अश्विनी रामाणे यांच्यातर्फे अ‍ॅड. तानाजी म्हातुगडे यांनी केला. हे प्रकरण नियमित खंडपीठापुढे जाण्याची आवश्यकता आहे. सुटीकालीन न्यायालय इतक्या खोलवर जाऊन सुनावणी देऊ शकत नाही, असे म्हणत खंडपीठाने सातही जणांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या निर्णयाला २० जूनपर्यंत स्थगिती दिली. तर राज्य सरकारला याबाबत १० जूनपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी आयुक्तांच्या आदेशावरही स्थगिती दिली की नाही, अशी विचारणा केल्यावर खंडपीठाने ज्या आदेशाच्या आधारे आयुक्तांनी याचिकाकर्त्यांना नगरसेवक म्हणून अपात्र ठरवले त्या आदेशावरच स्थगिती दिल्यानंतर पुढील आदेश देण्याची आवश्यकता नाही, असे म्हटले.