शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

तापमानाचे हेलकावे; मुंबई १६ अंशावर स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 05:47 IST

मुंबईसह राज्याच्या किमान तापमानात काही अंशी वाढ नोंदविण्यात मुंबईसह राज्याच्या किमान तापमानात काही अंशी वाढ नोंदविण्यात येत आहे.

मुंबई : मुंबईसह राज्याच्या किमान तापमानात काही अंशी वाढ नोंदविण्यात मुंबईसह राज्याच्या किमान तापमानात काही अंशी वाढ नोंदविण्यात येत आहे. मुंबईसह राज्यातील तापमानात होणारे हे बदल नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मागील तीन दिवसांपासून हा बदल नोंदविण्यात येत असून, मुंबईचे किमान तापमान १६ अंशांच्या आसपास स्थिर असले तरी ‘ताप’दायक सूर्यकिरणांमुळे मुंबईकरांना उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे रात्रीच्या वातावरणातील गारवा काही अंशी कमी झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी मुंबईचे किमान तापमान १६ अंश नोंदविण्यात आले असून, येथील गारवा कायम असल्याचा दावा हवामान खात्याने केला आहे.गोव्यासह संपूर्ण राज्यात चार दिवस हवामान राहणार कोरडेभारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईचे किमान तापमान शुक्रवारी १६.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, राज्यात सर्वात कमी किमान तापमान नागपूर येथे ८.७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. १९ ते २२ जानेवारी दरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. तर मुंबई आणि आसपासच्या परिसरातील हवामान शनिवारसह रविवारी कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३३, १७ अंशांच्या आसपास राहील. आकाश मुख्यत: निरभ्र राहील. गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे; तर उर्वरित भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.