शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

जड दप्तर अधिकाऱ्यांना वाहायला सांगा

By admin | Updated: October 18, 2016 05:39 IST

उच्च न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांनाही विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याइतकी बॅग एक दिवस कार्यालयात आणायला सांगा म्हणजे त्यांना मुलांचा त्रास समजेल

मुंबई : दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात राज्य सरकार पोकळ आश्वासने देत असून, काहीही ठोस कारवाई करीत नसल्याने संतापलेल्या उच्च न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांनाही विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याइतकी बॅग एक दिवस कार्यालयात आणायला सांगा म्हणजे त्यांना मुलांचा त्रास समजेल, अशा कडक शब्दांत राज्य सरकारची आणि संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी तोडगा काढा आणि आतापर्यंत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे किती पालन केलेत, तेही आम्हाला सांगा, असे निर्देश न्या. व्ही. एम. कानडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने राज्य सरकारला दिले. आतापर्यंत ८५ टक्के शाळांमध्ये सरकारच्या परिपत्रकावर अंमलबजावणी केली नसल्याची बाब याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणली. त्यावर खंडपीठाने अधिकारीच याबाबत गंभीर नसल्याचे म्हटले. ‘अधिकारी ही बाब गांभीर्याने घेतच नाहीत. त्यामुळे त्यांना एक दिवस मुलांच्या दप्तराच्या ओझ्याएवढी बॅग कार्यालयात आणायला सांगा म्हणजे त्यांना याचे गांभीर्य समजेल,’ असा शेराही हायकोर्टने यावेळी मारला. याचिकाकर्त्यांनी यासंदर्भात राज्य सरकारला आदेश देण्याची विनंती खंडपीठाला केली. त्यावर खंडपीठाने आदेश देऊन त्याचे पालन करणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे म्हणत या याचिकेवरील सुनावणी २६ आॅक्टोबर रोजी ठेवली आहे. या वेळी सरकारला दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आतापर्यंत काय करण्यात आले आहे, याची माहिती खंडपीठाला द्यायची आहे. लहान मुलांना पाठदुखी, मानदुखीसारखे आजार बळावतात. त्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचा आदेश राज्य सरकारला द्यावा, अशा मागणीची याचिका पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली (प्रतिनिधी)>परिपत्रकावर अंमलबजावणीआतापर्यंत काहीच शाळांमध्ये दप्तराचे ओझे कमी करण्यात आले असून, ८५ टक्के शाळांमध्ये सरकारच्या परिपत्रकावर अंमलबजावणी करण्यात आली नसल्याची बाब याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणली.