शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हलक्या वजनाच्या ब्रह्मोसमुळे ‘तेजस’ अधिक शक्तिमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 17:10 IST

जगातील सर्वाधिक वेगवान आणि अतिउच्च दर्जाची स्फोटके वाहून नेण्याची क्षमता असणाऱ्या नेक्स्ट जनरेशन ब्रह्मोसच्या विकासाला सुरुवात केली आहे. हे क्षेपणास्त्र वजनाने हलके, लांब पल्ल्याबरोबर जास्त स्फोटके वाहून नेण्याची क्षमता तसेच लक्ष्याचा अचूक वेध घेणारे असणार आहे.

निनाद देशमुख 

पुणे : जगातील सर्वाधिक वेगवान आणि अतिउच्च दर्जाची स्फोटके वाहून नेण्याची क्षमता असणाऱ्या नेक्स्ट जनरेशन ब्रह्मोसच्या विकासाला सुरुवात केली आहे. हे क्षेपणास्त्र वजनाने हलके, लांब पल्ल्याबरोबर जास्त स्फोटके वाहून नेण्याची क्षमता तसेच लक्ष्याचा अचूक वेध घेणारे असणार आहे. हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड आणि डीआरडीओतर्फे बनविण्यात आलेल्या आणि नुकतेच भारतीय हवाई दलात दाखल झालेल्या तेजस या हलक्या लढाऊ विमानावर ही क्षेपणास्त्र बसविण्यात येणार असून, यामुळे तेजसची मारकक्षमता आणखी वाढणार आहे. या क्षेपणास्त्रांचे मेकॅनिकल स्ट्रक्चर आणि प्रारूप आराखडा तयार करण्यात आला असून, येत्या तीन ते चार वर्षांत हे क्षेपणास्त्र पूर्णत: तयार होणार आहे.

              भारत आणि रशिया यांच्या संयुक्त प्रयत्नातून ब्रह्मोस हे सुपरसोनिक क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत हे क्षेपणास्त्र जगात सर्वाधिक वेगवान आणि लक्ष्याचा अचूक वेध घेणारे आहे.  भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दलाला हे क्षेपणास्त्र सुपूर्द करण्यात आले आहे. या क्षेपणास्त्राच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. गेल्या वर्षी सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानातून याची चाचणी केली असून, ते हवेतून लक्ष्याचा वेध घेण्यास सक्षम झाले आहे. या प्रकारची क्षमता असलेल्या मोजक्या देशांपैकी भारत देश झाला आहे. या यशामुळे आता भारतीय आणि रशियाची तंत्रज्ञांनी नेक्स्ट जनरेशन ब्रह्मोस क्षेपणास्त्र तयार करण्यास सुरुवात केली आहे. या बाबत ब्रह्मोस कॉर्पोरेशनचे प्रमुख डॉ. सुदीप मिश्रा म्हणाले, ब्रह्मोस अतिशय शक्तिशाली क्षेपणास्त्र आहे. यामुळे तिन्ही सैन्य दलांनी याचा स्वीकार केला आहे. भविष्यातील युद्धाचा विचार करता हलक्या क्षेपणास्त्राचा विकास सुरू आहे. भारतीय हवाई दलाच्या दाखल झालेल्या तेजस या हलक्या लढाऊ विमानासाठी कमी वजनाच्या ब्रह्मोस तयार करण्याचे काम सुरू आहे. जवळपास १२०० ते १३०० किलोपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट आहे.  या क्षेपणास्त्रामुळे तेजसची तसेच  वायुदलाचीही ताकद वाढणार आहे. याबरोबरच या क्षेपणास्त्राचा निर्यातीचाही विचार सुरू असून, केंद्र सरकारच्या धोरणानुसार  निर्णय घेण्यात येणार आह,े असेही  ते म्हणाले. 

बनावटीच्या हलक्या लढाऊ विमानात सर्व बदल करण्यात आले असून, या विमानांना अंतिम उड्डाण परवाना देण्यात आला असून, या विमानांच्या पुढील उत्पादनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.विमानाच्या निर्मितीस १९८० पासून सुरुवात केली. यात डीआरडीओनेही महत्त्वाची भूमिका बजावली होती. एअरो इंडिया या प्रदर्शनात  तेजस एमके १ या लढाऊ विमानांना उड्डाणाचा अंतिम परवाना मिळाल्याचे घोषित करण्यात आले होते. एचएएलने तेजस मार्क १ ए आणि मार्क २ तयार करण्यासाठी रोड मॅप तयार केला आहे. २०२३ पर्यंत तेजस मार्क १ ए पूर्णपणे वायुदलाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

ब्रह्मोसचा पल्ला वाढणार 

ब्रह्मोस हे सध्या ३०० ते ३५० किलोमीटरपर्यंत डागता येऊ शकते. याचा पल्ला वाढवण्यासाठी ब्रह्मोस एम के २ प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या द्वारे या क्षेपणास्त्राचा वेग आणखी वाढणार असून, त्याचा पल्ला हा ६०० किमी पर्यंत नेण्यात येणार आहे.

ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे गायडेड सुपर सॉनिक असून, याचा वेग जवळपास २.८ मॅक एवढा आहे.  एकदम कमी उंचीवरून उडण्याची क्षमता यात असून, यामुळे शत्रूच्या रडाराला चकवा देऊ शकते.  ब्रह्मोस हे जमिनीवरून हवेत, हवेतून पाण्यात, पाण्यातून हवेत तसेच जमिनीवरून जमिनीवरील लक्ष्यावर डागता येऊ शकते. या पुढे भविष्यात या क्षेपणास्त्राचे वजन कमी करून तेजस एमके १ आणि एमके २ या विमानांवर लावली जाणार आहे. लाईट वेट ब्रह्मोसमुळे देशाची मारक क्षमता वाढणार आहे. 

- डॉ. सुदीप मिश्रा, सीईओ ब्रह्मोस

टॅग्स :Brahmos Missileब्राह्मोसairforceहवाईदल