शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना

By admin | Updated: June 12, 2014 01:01 IST

ग्रामीण भागातील अनधिकृत बांधकामांना चाप या गोंडस नावाखाली बांधकामांच्या मंजुरीचे अधिकार आता थेट तहसीलदारांना बहाल करण्याचा घाट महसूल मंत्रालयात घातला जात आहे. या माध्यमातून राज्यातील

अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी प्रस्ताव : २७ हजार ग्रामपंचायतींच्या अधिकारावर मात्र गदा राजेश निस्ताने - यवतमाळग्रामीण भागातील अनधिकृत बांधकामांना चाप या गोंडस नावाखाली बांधकामांच्या मंजुरीचे अधिकार आता थेट तहसीलदारांना बहाल करण्याचा घाट महसूल मंत्रालयात घातला जात आहे. या माध्यमातून राज्यातील २७ हजार ५०० सरपंच व ग्रामपंचायतींच्या अधिकारावर वरवंटा फिरविला जाणार आहे. ग्रामीण भागात कुठेही बांधकाम करायचे असेल तर ग्रामपंचायतीची परवानगी घ्यावी लागते. ग्रामपंचायतीच्या सभेमध्ये या संबंधीचा प्रस्ताव ठेऊन त्याला मंजुरी दिली जाते. सरपंचाच्या स्वाक्षरीने ही मंजुरी जारी होते. परंतु आता हे अधिकार सरपंच आणि ग्रामपंचायतीकडून काढून घेतले जाणार आहे. त्याऐवजी संबंधित तहसीलदाराला हे अधिकार हस्तांतरित करण्याची तयारी सुरू आहे. या माध्यमातून राज्यातील २७ हजार ५०० ग्रामपंचायती व सरपंचांचे अधिकार गोठविण्याचा महसूल मंत्रालयाचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्यात ग्रामीण भागात वाढलेली अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमण हे कारण पुढे केले गेले आहे. ग्रामपंचायतींचे लवचिक धोरण यासाठी कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवला गेला. अनधिकृत बांधकामे न्यायालयात गाजत आहेत, त्यामुळे राज्य सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. हाच धागा पकडून यापुढे बांधकाम मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना सोपविले जाणार आहे. त्यासाठी महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री गटाची स्थापना केली गेली. मात्र महसूल मंत्र्यांनी हे अधिकार आपल्याच खात्याकडे ठेवण्याला पसंती दर्शविल्याने राज्याच्या पंचायत खात्यात प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. ७३ व्या घटना दुरुस्तीत पंचायतराज योजनेअंतर्गत गाव-खेडे आणि ग्रामपंचायतींना संपूर्ण अधिकार देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशी त्रि-स्तरीय व्यवस्था निर्माण केली गेली. परंतु प्रत्यक्षात ग्रामपंचायतींचे अधिकार वाढविण्याऐवजी कपात करण्यावरच नोकरशाहीचा अधिक भर असल्याचे या प्रकरणावरून दिसून येते.