शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

५ जूनला तहसीलदार कार्यालय बंद करणार!

By admin | Updated: June 3, 2017 03:44 IST

शेतकऱ्यांच्या संपावर येत्या दोन दिवसांत तोडगा काढला नाही, तर ५ जूनला राज्यातील सर्व तहसीलदार कार्यालयांचा ताबा घेण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकऱ्यांच्या संपावर येत्या दोन दिवसांत तोडगा काढला नाही, तर ५ जूनला राज्यातील सर्व तहसीलदार कार्यालयांचा ताबा घेण्याचा इशारा अखिल भारतीय किसान सभेने दिला आहे. या आंदोलनात किसान सभेसोबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि सीटू ही कामगार संघटना खांद्याला खांदा लावून उभे असतील, अशी माहिती माकपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार सीताराम येचुरी यांनी दिली. ते मुंबई मराठी पत्रकार संघात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.येचुरी म्हणाले की, शेतकऱ्यांनी वर्षभरापूर्वी कर्जमुक्ती, शेतीमालाला हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी २ दिवस नाशिक ठप्प केले होते. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी ६ महिन्यांचा वेळ मागत आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र, तब्बल एक वर्ष उलटल्यानंतरही शेतमालाला हमीभाव नाही. उत्पादनाच्या दीडपट भाव देण्याचे आश्वासन सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी दिले होते, त्याची पूर्तता अद्याप केलेली नाही. फक्त सांप्रदायिक मुद्दे पुढे करून, सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. दरवर्षी २ कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, सद्यस्थितीत देशात दरवर्षी १.५ कोटी सुशिक्षित तरुण महाविद्यालयांतून बाहेर पडत असून, केवळ १.३ लाख रोजगार निर्मिती होत आहे. त्यामुळे बेरोजगारांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे सरकार कानाडोळा करत असल्यानेच, शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन करावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.किसान सभेचे केंद्रीय सहसचिव कॉ. अशोक ढवळे म्हणाले की, ‘कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकरी तहसीलदार कार्यालयाचा ताबा घेतील. शेतकरी संपामुळे शहरी भागातील मध्यमवर्गीयांची परवड होत असली, तरी त्याग केल्याशिवाय क्रांती होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत सर्वसामान्यांनी त्याग करण्यास तयार राहावे. बड्या उद्योगपतींची कर्जे माफ होतात. मग शेतकऱ्यांवरच अन्याय का?’ असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला.