नायगांव : काही वर्षांपुर्वी मानवाने उत्क्रांती घडवून आणली. इतर जीवसृष्टीच्या तुलनेत मानव उत्क्रांतीचा दर, गती जास्त आहे. जास्त बुद्धीमत्ता व प्रगल्भ शक्ती निसर्गाने मानवाला दिली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान समजुन त्या आधारे आपल्यासाठी सुविधा निर्माण केल्या अस मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. ते नवरात्रीनिमित्त आयोजित नवदुर्गा मित्र मंडळ, चोबारे, वसई येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
डॉ. तात्याराव लहाने, माजी महापौर राजीव पाटील, निवृत्त न्यायाधिश विजय चिटणीस इ. मान्यवर उपस्थित होते. काकोडकर पुढे म्हणाले, आपल्या उत्क्रांतीचा प्रभाव वाढला आणि वाढत राहील. यावेळी येणारी वळणो फायदय़ाची की नुकसानीची हा प्रश्न निकालात निघतो. तंत्रज्ञानाचा गैरवापर केल्याचाही आरोप सुरू आहे न त्या पिढीला शिक्षण चांगली मूल्ये दिली तर तंत्रज्ञान वाईट नाही. अणुशक्ती बाबतही व रेडीऐशनबाबतही लोकांचे गैरसमज आहेत. इतर देश पुढे जात असताना त्याच्याशी स्पर्धा न करता आपण मागासलेलेच रहायचे का? असा प्रश्न त्यांनी केला. आज ज्या रेडीएशनची भीती बाळगली जाते त्यामुळेच तर कर्करोग व अन्य वैद्यकीय उपचार सहज, सुलभ शक्य झाले आहेत.
तर डॉ. लहाने यांनी याच रेडीएशन बाबत शस्त्रक्रिया किती सुलभ झाल्याची माहिती दिली. पुर्वी यंत्रणा सक्षम नव्हती. वैज्ञानिक नसते तर हे शक्य झाले नसते. देशात अडचण लोक संख्येची आहे. आज सामुग्री कमी पडायला लागली आहे. याबाबत कधीच चर्चासत्र होत नाहीत. आजमितीस हा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. याबरोबर अन्य मान्यवरांची समायेचीत भाषणो झाली. यावेळी अनेक ग्रामस्थांनी विज्ञान व आरोग्याबाबत महत्वाची माहिती आत्मसात केली.
(वार्ताहर)