औरंगाबाद : मुंबईहून बुधवारी औरंगाबादला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात धावपट्टीवरून उड्डाण घेत असतानाच तांत्रिक बिघाड झाला. या विमानात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, औरंगाबाद महानगरपालिकेचे उपमहापौर प्रमोद राठोड व स्थायी समिती सभापती दिलीप थोरात यांच्यासह १५० प्रवासी होते. तांत्रिक बिघाडामुळे दीड तास हे विमान धावपट्टीवरच उभे ठेवण्यात आले.दीड तास विमान जागचे हललेही नाही. एसी बंद पडल्यामुळे तापमान वाढल्याने प्रवाशांना त्रास होऊ लागला. दुपारी ४ वाजता येणारे हे विमान चार तास उशिराने रात्री ८ वाजता चिकलठाणला लॅण्ड झाले.
मुंबई-औरंगाबाद विमानात तांत्रिक बिघाड
By admin | Updated: November 4, 2015 23:42 IST