शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

संघ लोकांना आवडू लागला आहे - मोहन भागवत

By admin | Updated: April 24, 2016 22:19 IST

गेल्या काही वर्षांपासून संघाच्या कार्याचा झपाट्याने विस्तार होत आहे. याबाबतीत सरसंघचालकांनी यावेळी भाष्य केले. संघ आता लोकांना आवडू लागला आहे. संघात न जाणारे लोकदेखील संघाकडे आशेने पाहत आहे

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. २४ - गेल्या काही वर्षांपासून संघाच्या कार्याचा झपाट्याने विस्तार होत आहे. याबाबतीत सरसंघचालकांनी यावेळी भाष्य केले. संघ आता लोकांना आवडू लागला आहे. संघात न जाणारे लोकदेखील संघाकडे आशेने पाहत आहे. जनतेचा संघावरील विश्वास वाढतो आहे. आत्मियतेमुळेच हे सर्व शक्य होत आहे. समाज व राष्ट्रहिताचे कार्य करणे महत्त्वाचे. यासाठी कुणाच्या शाबासकीची अपेक्षा ठेवायला नकोत. आम्ही पृथ्वीचा बाजार बनविला नाही, तर पृथ्वीला कुटुंब बनविण्यावर आमचा भर आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. नागपूरातील ह्यसारथीह्ण या स्वयंसेवी संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्ष समारंभाप्रसंगी रविवारी ते बोलत होते.

सरकारकडून विविध मुद्द्यांवर अपेक्षा करण्याचे प्रस्थ वाढले आहे. यातून सरकारला उठसूठ विचारणादेखील केली जाते. यामुळे जगातील लोकांना हा देश नेमका चालतो कसा असा प्रश्न पडतो. यातून विनोदही होतात. परंतु सर्वांनी लक्षात घ्यायला हवे की हा देश सरकार नव्हे तर समाजाची सक्रियता व गुणवत्तेवर चालतो, या शब्दांत डॉ.मोहन भागवत यांनी केंद्रावर टीका करणाऱ्यांना चिमटा काढला आहे. पुणेकर आळशी, काहीही केले नाहीपुण्यातील उद्योजक डी.एस.कुलकर्णी यांनी यावेळी नागपूरवर स्तुतिसुमनांचा वर्षाव करत पुणेकरांना चिमटे काढले. पुणेकरांनी वेगळे असे काहीही केले नाही. ते आळशी आहेत. केवळ मुंबईच्या छायेत असल्यामुळे पुण्याचा विकास झाला. नागपूरात विकासाला प्रचंड संधी आहे. नागपूरातील युवकांनी जगभरात झेंडा रोवला आहे. राजकारणात नसलो तरी जनतेसाठी खूप काही करु शकतो हे ह्यसारथीह्णसारख्या संस्थेने दाखवून दिले आहे, असे डी.एस.कुलकर्णी म्हणाले.