शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पदपथांवरील मुलांना मिळणार शिक्षण

By admin | Updated: April 29, 2016 03:28 IST

देशातील रस्त्यांवर सध्या रहात असलेल्या पाच लाख मुलांसह मुख्य प्रवाहाच्या बाहेर असणाऱ्या मुलांसाठी सेव्ह द चिल्ड्रन संस्थेने ‘एव्हरी लास्ट चाइल्ड’ ही मोहीम गुरुवारी मुंबईत सुरु केली.

मुंबई : देशातील रस्त्यांवर सध्या रहात असलेल्या पाच लाख मुलांसह मुख्य प्रवाहाच्या बाहेर असणाऱ्या मुलांसाठी सेव्ह द चिल्ड्रन संस्थेने ‘एव्हरी लास्ट चाइल्ड’ ही मोहीम गुरुवारी मुंबईत सुरु केली. या माध्यमातून मुलांना आरोग्याची माहिती आणि शिक्षण देण्यात येणार आहे. याविषयी, संस्थेच्या राज्य कार्यक्रम व्यवस्थापक संध्या कृष्णन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ‘सेव्ह द चिल्ड्रन’च्या मोबाइल लर्निंग सेंटर प्रकल्पावर ही मोहीम बेतलेली आहे. दोन वर्षांत गोवंडी विभागात हा प्रकल्प राबविण्यात आला. प्रकल्पाच्या माध्यमातून १ हजार ७२८ मुलांना वाचन आणि लेखनाचे शिक्षण देण्यात आले. १० मुलांचे गट ८८८ मुलांपर्यंत पोहोचले, त्यांनी या मुलांना बालसुरक्षेच्या संदर्भातील माहिती दिली. त्याचप्रमाणे, १ हजार ४४१ कुटुंबांना त्यांच्या मुलांना जवळच्या अंगणवाडीमध्ये प्रवेश घेण्यासाठी मार्गदर्शन केले. ३८२ मुले या माध्यमातून मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये जाऊ लागली.यावेळी, संध्या कृष्णन यांनी सांगितले की झोपडपट्ट्यांमध्ये आणि रस्त्यांवर राहणारी लाखो मुले ‘अदृश्य जिणे’ जगत असतात. त्यांच्या जन्माची कोणतीही नोंदणी सरकारी खात्यांमध्ये नसते. तसेच, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची ओळख सिद्ध करणारी कागदपत्रे नसतात. संस्थेच्या माध्यमातून या मुलांच्या नोंदणीसाठी सज्ज असून त्यांची तत्काळ नोंदणी करण्यासाठी आणि त्यांना आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षा या सेवा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. (प्रतिनिधी)