शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकेतर कर्मचारी रस्त्यावर उतरणार

By admin | Updated: February 8, 2016 04:08 IST

राज्यातील शासनमान्य अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालये, सैनिकी शाळा व अध्यापक विद्यालयांतील हजारो शिक्षकेतर कर्मचारी सुधारित

मुंबई : राज्यातील शासनमान्य अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालये, सैनिकी शाळा व अध्यापक विद्यालयांतील हजारो शिक्षकेतर कर्मचारी सुधारित आश्वासित प्रगती योजनेपासून वंचित आहेत. परिणामी, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षण व वित्त विभागाने तत्काळ निर्णय घेतला नाही, तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा शिक्षक परिषदेने दिला आहे.शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे अनुदानित संस्थांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाने कालबद्ध पदोन्नतीची वेतनश्रेणी योजना लागू केली होती. त्यानंतर शासनाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू केली असून, अनुदानित शाळांमधील शिक्षकेतरांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना अद्यापही लागू झाली नसल्याचे बोरनारे यांनी सांगितले. परिणामी, राज्यातील हजारो शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. आत्तापर्यंत शेकडो कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या सेवानिवृत्तिवेतनावरही विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे तत्काळ सुधारित योजना लागू केली नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.वित्त विभागाने मान्यता न दिल्याने सुधारित आश्वासित योजनेचा प्रस्ताव प्रलंबित आहे; शिवाय प्रस्ताव मंत्री मंडळासमोर जाणे आवश्यक असूनही शिक्षण विभाग कार्यवाही करण्यात उत्सुक दिसत नाही. शिक्षण विभागालाही या प्रकरणी जागे करण्याचा प्रयत्न केला, मात्र सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे परिषदेने सांगितले. (प्रतिनिधी)