शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

शिक्षकांना निवडश्रेणीसाठी एमए शिक्षणशास्त्र ग्राह्य धरणार

By admin | Updated: July 18, 2016 02:13 IST

राज्यातील खासगी माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना निवडश्रेणीसाठी एमए शिक्षणशास्त्र ही पदवी ग्राह्य धरली जाईल,

मुंबई : राज्यातील खासगी माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना निवडश्रेणीसाठी एमए शिक्षणशास्त्र ही पदवी ग्राह्य धरली जाईल, असा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे या आदेशाचा फायदा राज्यातील हजारो शिक्षकांना मिळणार आहे.राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना त्रिस्तरीय वेतनश्रेणी लागू आहे. त्यात १२ वर्षांनंतर वरिष्ठ वेतनश्रेणी व २४ वर्षांनंतर निवडश्रेणी दिली जाते. २४ वर्षांनंतर मिळणाऱ्या निवडश्रेणीसाठी शासनाने काही अटी घातल्या आहेत. शैक्षणिक पात्रता वाढविणे बंधनकारक असेल, ही त्यातील महत्त्वाची अट होती. त्यानुसार अपदवीधर शिक्षकांनी पदवीधर व पदवीधर शिक्षकांना पदव्युत्तर पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे. काही शिक्षकांना नियमित उपस्थिती आवश्यक असलेला पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करता येत नाही. बी.एसस्सी. झालेल्या शिक्षकांना एम. एसस्सी. पदवी प्राप्त करता येत नसल्याने हजारो शिक्षक निवडश्रेणीपासून वंचित राहत होते. यासाठी अनेक विद्यापीठाने एम.ए.शिक्षणशास्त्र ही शिक्षण क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू केला. मात्र शिक्षण विभाग निवडश्रेणीसाठी ही पदवी ग्राह्य धरत नव्हते. (प्रतिनिधी)