शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक दिनावर बहिष्कार टाकण्याचा शिक्षकांचा इशारा

By admin | Updated: August 7, 2016 21:10 IST

शिक्षकांचे वेतन गणेशोत्सवापूर्वी सुरु करा, नाही तर शिक्षण दिनावर बहिष्कार टाकू, असा इशारा शिक्षक परिषदेने दिला आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 7-  राज्यातील अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांमधील शिक्षकांचे वेतन गणेशोत्सवापूर्वी सुरु करा, नाही तर शिक्षण दिनावर बहिष्कार टाकू, असा इशारा शिक्षक परिषदेने दिला आहे. याआधी पावसाळी अधिवेशनात शासनाने अनुदान पात्र शाळांतील शिक्षकांचे वेतन तत्काळ सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते पूर्ण केले नसल्याने हा शिक्षक संघटनेला हा आक्रमक पवित्रा घ्यावा लागला आहे.शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी सांगितले की, अनुदान पात्र शाळांंतील शिक्षकांच्या वेतन देण्यासंदर्भात अद्यापही कार्यवाही सुरु झालेली नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये संतापाची भावना आहे. परिणामी तातडीने वेतन सुरु केले नाही, तर ५ सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर परिषदेचे सर्व सदस्य शिक्षक बहिष्कार टाकतील. शिवाय शासकिय कार्यक्रही होऊ देणार नाहीत. शासनाने विनाअनुदानित शाळा व वर्ग तुकड्यांचे मूल्यांकन करून मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार १६२ कोटी २५ लाख रुपयांचे अनुदान घोषित केले. मात्र घोषणा केली असली, तरी त्याची अंमलबजावणी मात्र अजूनही होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले की, पावसाळी अधिवेशनात गणपतीपूर्वी वेतन सुरु करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. गणपतींच्या पाद्यपूजन सोहळ््याला मुहूर्त मिळाला असून, शासनाच्या कार्यवाहीला मात्र मुहूर्त सापडत नाही आहे. त्यामुळे अनुदान पात्र शाळांतील शिक्षकांच्या वेतनाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. याबाबत शिक्षण विभागाने तातडीने वित्त विभागाकडे बैठक घेण्याची आवश्यकता आहे. मात्र गणेशोत्सवापूर्वी वेतन देण्यासाठी शिक्षण विभागाकडून असा जलद पाठपुरावा होत नसल्याचे दिसत आहे.मुळात अनुदान मिळावे म्हणून शिक्षकांनी आंदोलनाची सेंच्युरी केली. त्यानंतर शासनाला थोडा पाझर फुटल्ययाने अनुदान मंजूर झाले होते. मात्र आता निधी वितरित करण्याची कार्यवाही करण्यासाठीही शिक्षकांना आंदोलन करावे लागत आहे. त्यामुळे १० ते १५ वर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांची शासनाने क्रूर चेष्टा चालविली असल्याचा आरोप बोरनारे यांनी लावला आहे.