शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचा पगार जिल्हा बँकेतून नको!

By admin | Updated: June 12, 2017 02:40 IST

बृहन्मुंबईतील खासगी अनुदानित, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बृहन्मुंबईतील खासगी अनुदानित, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत अदा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाचा शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांमधून तीव्र निषेध केला जात आहे.यासंदर्भात शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी सांगितले की, जिल्हा मध्यवर्ती बँकांमार्फत उशिरा होणाऱ्या वेतनामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दरमहा आर्थिक नुकसान सोसावे लागत होते. १० ते १२ दिवस उशिरा होणाऱ्या पगारांमुळे गृहकर्ज आणि इतर कर्जांचे हफ्ते चुकल्याने कर्मचाऱ्यांना दंड भरावा लागत होता. जिल्हा बँकांच्या मनमानी कारभाराला कंटाळून शिक्षक भारतीने मुंबईतील शिक्षकांचे पगार राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत करण्यासाठी सतत ४ वर्षे पाठपुरावा केला होता. त्याचेच यश म्हणून ५ आॅक्टोबर २०११पासून मुंबईतील शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार युनियन बँक आॅफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बँकेतून होत होते. गेली सहा वर्षे युनियन बँक आॅफ इंडियाने शिक्षक, शिक्षकेतरांना सुरळीत व नियमित पगार दिले. शासनाकडून पैसे उशिराने आले, तरी बँकेमार्फत पगार कधीही उशिरा झाले नाहीत. अगदी एप्रिल महिन्यातही बँकेने वेळेत पगार देण्याची भूमिका पार पाडली. तरीही राज्यभर जिल्हा बँका अडचणीत येत असताना, केवळ मुंबई जिल्हा सहकारी बँकेला संजीवनी देण्यासाठी मुंबईतील शिक्षक-शिक्षकेतरांचा बळी दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेनेही या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे. शिवाय मुख्यमंत्री, वित्तमंत्री व शिक्षणमंत्री यांनी संबंधित निर्णय बदलण्याची मागणी संघटनेने केली आहे. जिल्हा बँकेला नवसंजीवनी द्यायची असेल, तर ग्रामसेवकापासून ते मुख्य सचिव व मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांचे पगार व मानधन हे जिल्हा बँकेतून द्यावेत, असा खोचक टोलाही संघटनेने लगावला आहे. पूर्वीचा शासन निर्णय बदलण्यामागे नेमके काय कारण होते? याची समर्पक उत्तरे मंत्रालयातील कोणत्याही अधिकाऱ्याकडे नसल्याचेही संघटनेचे म्हणणे आहे.