शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

बदली रोखण्यासाठी शिक्षिकेचे नाट्य!

By admin | Updated: August 2, 2016 02:18 IST

वाकोल्यात एका उर्दू शाळेमध्ये १६ शाळकरी मुलींचा विनयभंग शिक्षकांनी केल्याचा आरोप स्थानिक नगरसेविकेने केला होता.

गौरी टेंबकर-कलगुटकर,

मुंबई- वाकोल्यात एका उर्दू शाळेमध्ये १६ शाळकरी मुलींचा विनयभंग शिक्षकांनी केल्याचा आरोप स्थानिक नगरसेविकेने केला होता. मात्र आपली बदली रोखण्यासाठी एका शिक्षिकेने हा बनाव केल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानुसार वाकोला पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत.वाकोल्याच्या उर्दू शाळेत विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याच्या वृत्तामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत सावधानता बाळगत सुरू केला. मात्र या आरोपात काही तथ्य नसून स्वत:ची बदली रोखण्यासाठी एका शिक्षिकेने केलेला हा बनाव असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी अद्याप एकाही पालकाने तक्रार केलेली नाही. या शाळेतील एका शिक्षिकेने बदली रोखण्यासाठी हे सर्व नाट्य घडवून आणल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकोला शाळेतून संबंधित शिक्षिकेची बदली बीकेसी परिसरात केली जाणार होती. मात्र हे तिला मंजूर नसल्याने ती या शाळेतील काही मुलींच्या घरी गेली आणि तिने या दोन शिक्षकांविरुद्ध या मुलींना आरोप करण्यास सांगितले. त्यामुळे या शिक्षिकेने पोलिसांची दिशाभूल करीत दोन शिक्षकांवर खोटा आरोप केल्याचेही एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. एकाही पालकाची अद्याप तक्रार न आल्याने आम्ही या प्रकरणातील सत्यता पडताळून पाहत असल्याचे वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महादेव व्हावळे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.।आरोपात काही तथ्य नाहीहे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत सावधानता बाळगत सुरू केला. मात्र या आरोपात काही तथ्य नसून स्वत:ची बदली रोखण्यासाठी एका शिक्षिकेने केलेला हा बनाव असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी अद्याप एकाही पालकाने तक्रार केलेली नाही.