शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील चाळे केल्याप्रकरणी शिक्षकाला अटक

By admin | Updated: August 2, 2016 23:56 IST

कारंजा तालुक्यातील लोहगाव शाळेतील प्रकार; ग्रामस्थांनी शिक्षकास पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन.

कारंजा लाड (जि. वाशिम) : तालुक्यातील ग्राम लोहगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने चवथीच्या वर्गात शिकणार्‍या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत ईल चाळे केल्याची घटना २ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान घडली. ही घटना कळल्यानंतर पळून गेलेल्या या शिक्षकाला ग्रामस्थांनी शेजारच्या गावातून पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, याप्रकरणी पोलीसांनी रात्री अकरा वाजताच्या सुमारास सदर शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.लोहगाव येथे इयत्ता पहिली ते चवथीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा आहे. या शाळेतील शिक्षक शिवदास बाबाराव निंघोट (वय ५0) हा गेल्या पंधरा दिवसांपासून चवथीच्या वर्गात शिकणार्‍या दोन विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे करत होता. या विद्यार्थिनींनी भीतीपोटी हा प्रकार घरी सांगितला नाही. मंगळवारी पुन्हा निंघोटने अश्लील चाळे केले, तेव्हा या विद्यार्थिनींनी घरी आई -वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यांनी लगेच या प्रकाराची माहिती नायक हिरासिंग चव्हाण व अन्य ग्रामस्थांना दिली व शाळेवर पोहोचले. संतप्त ग्रामस्थ जाब विचारण्यासाठी शाळेत येण्याची कुणकुण लागताच शिक्षक निंघोटने काजळेश्‍वर येथे पलायन केले. ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करून काजळेश्‍वर येथे पकडून पुन्हा शाळेत आणले. यासंदर्भात कारंजा पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांनी या शिक्षकाला ताब्यात घेतले. उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी करण्यात आली. यानंतर रात्री अकरा वाजताच्या सुमारास शिक्षकाविरुद्ध भादंवि ३७६ (२) (ब) (फ) (आय) (म), बालकाचे लैंगिक गुन्ह्यापासून सरंक्षण २0१२ चे कलम ४ व ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावकरी संतप्तसायंकाळी सात वाजता पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर रात्री जवळपास अकरा वाजेपर्यंंत या शिक्षकाची चौकशी सुरू होती. चार तास चौकशी केल्यानंतरही गुन्हा दाखल होत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर ग्रामस्थांचा राग शांत झाला.