शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक मेळाव्यात उमेदवारीवरून जुंपली

By admin | Updated: January 23, 2017 04:44 IST

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने कोकण विभाग शिक्षक मतदार संघात दिलेल्या उमेदवारीवरून चांगलेच घमासान पाहायला मिळत

मुंबई : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने कोकण विभाग शिक्षक मतदार संघात दिलेल्या उमेदवारीवरून चांगलेच घमासान पाहायला मिळत आहे. राजापूर तालुक्यातील आदर्श विद्या मंदिर वातूळ येथे आयोजित शिक्षक मेळाव्यात रविवारी चांगलाच गोंधळ झाला. या वेळी शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणुनाथ कडू हेच अधिकृत उमेदवार असून, रामनाथ मोते हे बंडखोर उमेदवार असल्याचे भगवानराव साळुंखे यांनी स्पष्ट केले.या आधी शिक्षक परिषदेचे माजी आमदार रामनाथ मोते यांना तिकीट नाकारत, शिक्षक परिषदेने अध्यक्ष वेणुनाथ कडू यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नाराज झालेल्या मोते यांनी स्वतंत्रपणे अर्ज भरला. मात्र, काही बंडखोर कार्यकर्त्यांकडून मोतेच परिषदेचे अधिकृत उमेदवार असल्याचे भासवले जात असल्याचा आरोप साळुंखे यांनी केला आहे. गेल्या ३० वर्षांपासून समर्पित भावनेने शिक्षक परिषदेसाठी काम करणारे कडू हेच अधिकृत उमेदवार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.रविवारी वातूळ येथील शिक्षक मेळाव्यात रामनाथ मोतेदेखील उपस्थित होते. तेव्हा शिक्षक परिषदेचे बॅनर वापरण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला?, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न का करत आहात? असे विविध प्रश्न मोते यांना कार्यकर्त्यांनी विचारले. त्यावर मोते आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह माघारी परतले. मात्र, यामुळे कोकण विभागातील निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. (प्रतिनिधी)