शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक आंतरजिल्हा बदली धोरण मंगळवारी ठरणार

By admin | Updated: March 13, 2017 03:48 IST

राज्यातील २५ ते ३० हजार आंतरजिल्हाबदलीग्रस्त शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली असून यासंदर्भात धोरण ठरविण्यासाठी ग्रामविकास सचिवांनी मंगळवारी मुंबईत बैठक बोलाविली आहे.

औरंगाबाद : राज्यातील २५ ते ३० हजार आंतरजिल्हाबदलीग्रस्त शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली असून यासंदर्भात धोरण ठरविण्यासाठी ग्रामविकास सचिवांनी मंगळवारी मुंबईत बैठक बोलाविली आहे. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न ‘लोकमत’ने लावून धरला होता. यासंदर्भात शिक्षक सहकार संघटनेने सतत पाठपुरावा केल्यानंतर धोरण निश्चितीसंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. सध्या आंतरजिल्हा बदलीमध्ये आपसी बदलीसाठी जात संवर्गाची अट मोठी अडचण ठरत आहे. संवर्ग न मिळालेले हजारो प्रस्ताव अडकून पडले आहेत. या आंतरजिल्हाबदलीग्रस्तांमध्ये राज्यभरात पती-पत्नी एकत्रीकरणाचे पाच हजार प्रस्ताव प्रतीक्षेत आहेत. याशिवाय अपंग, विधवा, घटस्फोटिता, परित्यक्ता, अट शिथील, एकतर्फी असे अनेक प्रस्ताव निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. आदिवासी भागात बदलीच्या प्रतीक्षेत असलेले शिक्षकही मोठ्या संख्येने आहेत. या सर्वांच्या नजरा या बैठकीकडे असून त्यातून निश्चितच सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)