शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

शिक्षक कुटुंबे आंदोलनाच्या पवित्र्यात

By admin | Updated: October 19, 2015 02:52 IST

आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्यभरातील शिक्षक एकवटले आहेत. निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

औरंगाबाद : आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्यभरातील शिक्षक एकवटले आहेत. निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत निर्णय न घेतल्यास आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेतील शिक्षक १ डिसेंबरपासून कुटुंबीयांसह मुंबईत बेमुदत उपोषण करणार आहेत. शिक्षक आंतरजिल्हा बदली सहकार कृती समितीच्या शिष्टमंडळाने अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यपाल, ग्रामविकासमंत्री, शिक्षणमंत्री, विरोधी पक्षनेते यांनाही निवेदन दिले. आंतरजिल्हा बदल्या न झाल्याने १० ते १५ वर्षांपासून राज्यातील जवळपास १२ हजार शिक्षकांपैकी काही आई-वडिलांपासून, तर कोणी पत्नी-मुलांपासून दूर आहेत. प्रत्येक कुटुंबाचे वेगळे दु:ख आहे. विस्कळीत कुटुंबांची व्यथा घेऊन १२ मे रोजी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. २८ जुलैला मुंबईतील आझाद मैदानात एकदिवसीय लाक्षणिक उपोषणही केले. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. ५ सप्टेंबरला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत पुन्हा मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. मात्र, त्याचाही उपयोग झाला नसल्याचे समितीचे राज्य अध्यक्ष अमर शिंदे, कार्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड आणि सचिव हनुमंत खुणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.(प्रतिनिधी)>राज्याचे रोस्टर एकच कराजिल्हानिहाय असलेले रोस्टर राज्यस्तरावर एकच करा. आंतरजिल्हा बदलीसाठी समान जात संवर्गाची अट रद्द करून उमेदवार ते उमेदवार करा, पती-पत्नी एकत्रीकरण प्रस्ताव विनाअट, विनाविलंब निकाली काढा, आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे संतोष पिट्टलवाड यांनी सांगितले. >बीड जिल्ह्यातील शिक्षक यवतमाळमध्ये कार्यरत आहेत. वडिलांना ते एकुलते एक. वडिलांच्या शरीरात अपेक्षित प्लेटलेट तयार होत नसल्याने दर १५ दिवसांनी रक्त तपासणी करावी लागते. त्याचा अहवाल औरंगाबादला द्यावा लागतो. त्यामुळे या शिक्षकाला दर १५ दिवसांनी यवतमाळवरून येऊन कसरत करावी लागते. वडिलांना त्यांची धावपळ पाहवत नाही. ते मुलाला म्हटले, तुझी ही धावपळ पाहवत नाही. नाहीतरी वय झाले आहे. मरू दे असेच मला.