शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उन्मत्त सरकारला धडा शिकवा

By admin | Updated: April 26, 2017 01:43 IST

सर्व बाजूंनी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या आणि सत्तेमुळे उन्मत्त झालेल्या राज्यातील सरकारला धडा शिकवा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केले.

कोल्हापूर : सर्व बाजूंनी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या आणि सत्तेमुळे उन्मत्त झालेल्या राज्यातील सरकारला धडा शिकवा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केले.कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, आरपीआय (कवाडे गट), युनायटेड जनता दल, समाजवादी पार्टी या विरोधीपक्षांच्या नेत्यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यास मंगळवारपासून कोल्हापूर येथून सुरुवात झाली. प्रारंभी शाहू महाराज यांच्या कसबा बावडा येथील लक्ष्मीविलास जन्मस्थळास भेट देऊन, कुलस्वामिनी अंबाबाईला कर्जमाफीसाठी साकडे घालण्यात आले. त्यानंतर, दसरा चौकात जाहीर सभा झाली. या वेळी सर्वच वक्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली. चव्हाण पुढे म्हणाले, सरकारने सुरुवातीपासून या संघर्षयात्रेची टिंगल केली. शेतकऱ्यांपेक्षा शहरातील ग्राहकांची संख्या अधिक असल्याने मतांचे राजकारण केले जात आहे. म्हणूनच साखरेला चांगला भाव मिळणार, याची चिन्हे दिसत असताना, पाच लाख टन कच्ची साखर आयात केली गेली. लाखो क्विंटल तूर आता मराठवाड्यात खरेदीअभावी पडून आहे. कांदा, तूर, सोयाबीन उत्पादक शेतकरी सर्वच बाजूंनी अडचणीत आला आहे. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होत असताना, महाराष्ट्रावर हा अन्याय कशासाठी? मंत्रालयात दाद मागायला येणाऱ्या शेतकऱ्याला झोडपणाऱ्या या सरकारला जाब विचारण्यासाठी, खाली खेचण्यासाठी आता पेटून उठा, असे आवाहनही त्यांनी केले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, ‘भिकारीसुद्धा एक रुपयाची भीक घेत नाही आणि सरकारने कांद्याला प्रतिकिलो एक रुपया अनुदान दिले आहे. तूर खरेदी केंद्रे बंद केली आहेत. पेट्रोलचे दर वाढविले आहेत. वीजदरात वाढ केली आहे; त्यामुळे आता तेथे आंदोलने उभारावी लागतील. आता यापुढचा टप्पा म्हणजे कर्जमाफी न देणाऱ्या सरकारच्या मंत्रालयाला घेराव घातला जाईल.’ यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, विद्या चव्हाण, प्रवीण गायकवाड यांचीही भाषणे झाली. व्यासपीठावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री जयवंतराव आवळे, हसन मुश्रीफ, रोहिदास पाटील, आमदार मोहन कदम आदी उपस्थित होते.