शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बाटलीबंद पाण्यातही ‘टीडीएस’ जास्तच!

By admin | Updated: April 20, 2016 05:51 IST

शुद्ध पाण्याच्या नावाखाली फक्त थंड केलेले बाटलीबंद पाणी विकून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. या पाण्यामधील टोटल डिझॉल्व्हड् सॉलिड (टीडीएस) अर्थात, क्षारांचे प्रमाण

खामगाव (बुलडाणा) : शुद्ध पाण्याच्या नावाखाली फक्त थंड केलेले बाटलीबंद पाणी विकून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. या पाण्यामधील टोटल डिझॉल्व्हड् सॉलिड (टीडीएस) अर्थात, क्षारांचे प्रमाण हे ठरावीक पातळीपेक्षा जास्त असल्याचे ‘लोकमत’ने ११ एप्रिल रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आले आहे.‘लोकमत’च्या चमूने खामगाव बसस्थानक परिसरातील हॉटेल्समध्ये पिण्यासाठी ठेवलेल्या थंड आणि तथाकथित शुद्ध पाण्याच्या जारमधील पाण्याचा टीडीएस तपासला असता, तो १२०च्या वर आढळून आला. एका समारंभात आणण्यात आलेल्या जारमधील पाण्याचा टीडीएसही ११५ आढळून आला. विशेष म्हणजे, काही ठिकाणी बाटलीबंद पाण्यामधील क्षारांचे प्रमाण जारमधील पाण्यापेक्षा जास्त होते. पाणी रोजच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. पाण्याची गुणवत्ता जमिनीच्या गुणधर्मावरही अवलंबून असते. प्रमाणापेक्षा जास्त फ्लोराईड, खारेपणा, लोहतत्त्व, आर्सेनिकयुक्त पाणी आरोग्यास अपायकारक असते. अशुद्ध पाणी पिण्यात आल्याने बरेच आजार संभवतात. त्यामुळे नागरिकांचा कल आरओ (रिव्हर्स ओसमॉसिस) मिनरल वॉटरकडे वाढला आहे. हेच पाणी थंड करून हॉटेल्समध्ये जारमध्ये विकले जाते. बहुतांश हॉटेल्स, दुकाने, एवढेच काय, मध्यमवर्गीयांच्या घरीदेखील आरओ वॉटरचे जार आढळतात. ग्राहक वाढल्याने अनेकांनी थंड पाण्याचा हा व्यवसाय सुरू केला आहे. उन्हाळ्यात याची वाढती मागणी पाहता, अनेक व्यावसायिक पाणी शुद्ध न करता, फक्त थंड करून वितरित करतात. तहान लागल्यावर पाण्याची गुणवत्ता ही दुय्यम बाब ठरते. त्यामुळे या प्रकारांच्या कुणी फारशा खोलात जात नाही. प्रत्येकाजवळ टीडीएस तपासण्याची यंत्रणासुद्धा नसते. त्याचाच गैरफायदा घेत, व्यवसायिक तुंबड्या भरत असल्याचे पाहायला मिळत आहे.