शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

वेतनाच्या भरपाईवर टीडीएस आकारू शकत नाही

By admin | Updated: May 21, 2017 02:24 IST

सेकंडमेंट अ‍ॅग्रिमेंटअंतर्गत दिलेल्या वेतनावर टॅक्स डिडक्टेड अ‍ॅट सोर्स (टीडीएस) लागू होत नाही, असा महत्त्वाचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे.

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सेकंडमेंट अ‍ॅग्रिमेंटअंतर्गत दिलेल्या वेतनावर टॅक्स डिडक्टेड अ‍ॅट सोर्स (टीडीएस) लागू होत नाही, असा महत्त्वाचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे.सेकंडमेंट अ‍ॅग्रिमेंट म्हणजे भारतीय कंपन्यांशी संलग्न असलेल्या परदेशी कंपन्या भारतीय कंपन्यांच्या कामासाठी त्यांचे कर्मचारी नियुक्त करतात. मात्र हे कर्मचारी थेट भारतीय कंपन्यांच्या वेतनपटावर नसतात. संबंधित कर्मचारी परदेशी कंपन्यांच्याच वेतनपटावर असतात. या खटल्यात असेसिंग आॅफिसरने (एओ) मार्क्स अ‍ॅण्ड स्पेन्सर रिलायन्स इंडिया कंपनीने मार्क्स अ‍ॅण्ड स्पेन्सरच्या पीएलसी लंडनच्या कंपनीला ४ कोटी ८३ लाख रुपये दिल्याबद्दल ‘डबल टॅक्सेशन अव्हाइडंस अ‍ॅग्रिमेंट’ मधील तरतुदीनुसार टेक्निकल सर्व्हिस म्हणून भारतीय कंपनीला टीडीएस भरण्याचा आदेश दिला. या आदेशाला भारतीय कंपनीने आयुक्तांपुढे अपील केले. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी व अन्य खर्चासाठी परदेशी कंपनीला दिली आहे. त्यामुळे ही रक्कम भरपाई व अन्य खर्चामध्ये मोडेल. टेक्निकल सर्व्हिस फीअंतर्गत ही रक्कम येणार नाही. आयुक्तांनी भारतीय कंपनीचा युक्तिवाद मान्य करत एओचा टीडीएस भरण्याचा आदेश रद्द केला. एओने या निर्णयाला महसूल लवादापुढे आव्हान दिले. लवादानेही आयुक्तांचा निर्णय योग्य ठरवला. त्यावर एओने असमाधान व्यक्त करत याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयानेही लवादाचा निर्णय योग्य ठरवला. संबंधित वेतनाच्या रकमेवर आधीच कर आकारला आहे. त्यामुळे भारतीय कंपनीला कर चुकविल्याप्रकरणी दोषी ठरवणे योग्य नाही, असा महत्वाचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला.