शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
3
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
4
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
5
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
6
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
7
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
8
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
9
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
10
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
11
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
12
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
13
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
14
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
15
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
16
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
17
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
18
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
19
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल

टीडीआर घोटाळ्याची चौकशी थंडावली

By admin | Updated: April 7, 2015 04:25 IST

कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या हद्दीत रस्ते व बगीचे विकसीत करून देण्याच्या बदल्यात ५५ प्रकरणांत देण्यात आलेल्या विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) घोटाळ्याची चौकशी करून

मुंबई : कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या हद्दीत रस्ते व बगीचे विकसीत करून देण्याच्या बदल्यात ५५ प्रकरणांत देण्यात आलेल्या विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) घोटाळ्याची चौकशी करून सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे तसेच आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण सोपवण्याची तयारी मागील सरकारने दाखवली होती. मात्र राज्यातील सत्ताधारी पक्ष हेच बदलापूरमधील सत्ताधारी असल्याने आणि आतापर्यंत हे प्रकरण लावून धरणारे आमदार किसन कथोरे हे भाजपात दाखल झाल्याने बदलापूरच्या टीडीआर घोटाळ््याची चौकशी थंड्या बस्त्यात टाकण्यात आली आहे.बदलापूर नगरपालिकेतील अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी संगनमत करून २०११ ते २०१३ या कालावधीत रस्ते व बगीचे विकसीत करून देण्याच्या बदल्यात स्वत:च्या मर्जीतील कंत्राटदारांना टीडीआर प्रमाणपत्र दिली. ही कामे देताना निविदा प्रक्रिया अमलात आणली नाही तसेच जुन्या रस्त्यांच्या उभारणीकरिताही टीडीआर दिले गेले. बगीचाचे टीडीआर देताना जमीन मालकाने स्वत:च भूखंडाला कुंपण घातले व चार खेळणी बसवून त्या जागेवर बगीचाचा टीडीआर घेतला, अशी तक्रार तत्कालीन राष्ट्रवादीचे आमदार किसन कथोरे यांनी केली होती. याबाबत त्यांनी दाखल केलेल्या लक्षवेधी सूचनेवर चर्चेअंती चौकशीचे आदेश तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी दिले होते.चौकशीत बदलापूर नगरपालिकेने निविदा न मागवता टीडीआर देण्याची प्रक्रिया पार पाडली, त्याचबरोबर नगरपरिषदेने शासनाकडून मार्गदर्शन घेणे गरजेचे होते आणि या संपूर्ण प्रकरणात नियमबाह्य कामे झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे किसन कथोरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ७ आॅगस्ट २०१४ रोजी पत्र लिहून सर्व दोषी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांची आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे यांच्यामार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. विधानसभेचे वारे सुरु होताच कथोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात उडी घेतली. आता ते भाजपाचे आमदार आहेत.