शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

टीडीसीसी बँकेला रोज २० कोटींचा पुरवठा

By admin | Updated: June 7, 2017 03:55 IST

जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, व्यापारी, सहकारी आणि नागरी आदी सुमारे एक हजार १२ बँकांना अत्यल्प रकमेच्या पुरवठ्यामुळे लाखो खातेदारांना त्याचा फटका बसला.

सुरेश लोखंडे। लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, व्यापारी, सहकारी आणि नागरी आदी सुमारे एक हजार १२ बँकांना अत्यल्प रकमेच्या पुरवठ्यामुळे लाखो खातेदारांना त्याचा फटका बसला. याविषयी लोकमतने वृत्त प्रसिद्ध करून रोकड तुटवड्याची समस्या उघड केली होती. या वृत्ताची दखल घेऊन लिड बँकेने प्रयत्न करून ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. यामुळे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेला १५ ते २० कोटी रुपयांचा रोज पुरवठा होत असून ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील ४५ एमटीएम आणि शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप करणे सुलभ झाले आहे. जिल्ह्यातील बँकांमध्ये सुमारे २०० ते २५० कोटींपेक्षा जास्त रकमेची उलाढाल होते. पण, रोकड तुटवड्यामुळे बँक ग्राहकांचे हाल झाले. जिल्ह्यातील एक हजार १५० एटीएम बंदावस्थेत होते. पण, त्यापैकी बहुतांश एटीएम आता सुरू आहेत. त्यामध्ये १०० कोटींपेक्षा जास्त रकमेचा भरणा रोज होत आहे. यानुसार, टीडीसीसी बँकदेखील त्यांचे ठाणे, पालघर जिल्ह्यातील ४५ एटीएम लवकरच सुरू करणार आहेत ्रअसे टीडीसीसीचे सीईओ भगीरथ भोईर यांनी सांगितले. टीडीसीसीच्या सुमारे १०१ शाखा आहेत. त्यांची रोज सुमारे २५ ते ५० कोटींची उलाढाल आहे. पण, केवळ दीड ते दोन कोटी रुपये दैनंदिन व्यवहारासाठी मिळत असत. पण, आता २० कोटी रुपयांचा पुरवठा होत असून त्यातून बँकेचे दैनंदिन व्यवहार सुरळीत झाल्याचा दावा भोईर यांनी केला. प्राप्त रक्कमेतून शेतकऱ्यांना खरीप पीक कर्जाचा पुरवठाजिल्ह्यातील कृषी विकास सहकारी संस्थांच्या ७८ लाख ६२९ शेतकऱ्यांना ४११ कोटी १६ लाख रुपयांचे खरीप पीक कर्ज टीडीसीसीने मंजूर केलेले आहे. प्राप्त होणाऱ्या रकमेतून शेतकऱ्यांनादेखील पीककर्जाच्या रकमा दिल्या जात आहेत. यासाठी रिझर्व्ह बँकेकडून फारसे सहकार्य झाले नाही. मात्र, अन्य बँकांकडे गुंतवलेली रकम टीडीसीसी घेत असल्यामुळे बँकेतील गंगाजळी वाढली आहे. त्यातून दैनंदिन व्यवहार, पीककर्ज आणि अन्य व्यवहार सुरळीत झाले आहेत.