शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कर वसुलीसाठी पालिका कर्मचारी करदात्यांच्या दारी

By admin | Updated: November 13, 2016 17:36 IST

मीरा-भार्इंदर पालिका हद्दीतील करदात्यांनी थकीत मालमत्ता करासह चालू आर्थिक वर्षातील कर जमा करण्यासाठी आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी रविवारी अधिकारी व कर्मचा-यांची बैठक घेतली.

राजू काळे/ऑनलाइन लोकमतभाईंदर, दि. 13 - मीरा-भार्इंदर पालिका हद्दीतील करदात्यांनी थकीत मालमत्ता करासह चालू आर्थिक वर्षातील कर जमा करण्यासाठी आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी रविवारी अधिकारी व कर्मचा-यांची बैठक घेतली. यात त्यांनी कर्मचा-यांना थेट थकीत करदात्यांच्या दारी जाऊन त्यांना कर भरण्यासाठी प्रवृत्त करण्याचे निर्देश दिले. पालिकेने गेल्या तीन दिवसांत सुमारे १० कोटी मालमत्ता कर वसुल केला असून, अद्यापही अनेक करदात्यांनी थकीत करासह चालू आर्थिक वर्षातील कर पालिकेत जमा केला नसल्याचे समोर आले आहे. यात मोठ्या थकबाकीदारांचा समावेश अधिक आहे. सकाळी १० ते रात्री, मध्यरात्रीपर्यंत सुरु असलेल्या कर वसुलीला करदाते चांगला प्रतिसाद देत असले तरी अपेक्षित वसुली होत नसल्याचे समोर आले आहे. सरकारच्या आदेशानुसार या कराच्या वसुलीसाठी जुन्या हजार, पाचशेच्या नोटा स्वीकारण्यासाठी पालिकेला १४ नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ दिल्याने हा कर वसुल करण्यासाठी सुट्टीच्या दिवशीसुद्धा कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहे. १४ नोव्हेंबरला मध्यरात्री १२ वाजेपर्यंत करवसुली सुरू राहणार असल्याने सर्व थकबाकीदारांसह चालू वर्षातील कराचा अद्याप भरणा न केलेल्यांनी कर जमा करण्यासाठी, त्यांना आवाहनाच्या माध्यमातून प्रवृत्त करण्याचे निर्णय आयुक्तांनी घेतला. त्यानुसार त्यांनी रविवारी पालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचा-यांची बैठक बोलावून त्यात कर्मचा-यांनी थेट थकबाकीदारांच्या दारी जाऊन त्यांना कर भरण्यासाठी प्रवृत्त करण्याचे निर्देश दिले. तसेच मोठ्या थकबाकीदारांना वरिष्ठ अधिका-यांद्वारे दूरध्वनी व मोबाईलवर संपर्क साधण्याचे आदेश देण्यात आले. यानुसार सकाळपासुनच पालिका अधिकारी व कर्मचारी करदात्यांना संपर्क साधण्यात व्यस्त झाले असून करवसुलीचा आकडा अधिकाधिक वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे. याबाबत आयुक्त डॉ. नरेश गीते म्हणाले, माझ्यासह वरिष्ठ अधिकारी थकबाकीदारांना फोनद्वारे संपर्क साधत असून कर्मचारी व कनिष्ठ अधिकारी, अभियंते करदात्यांना कर जमा करण्याचे आवाहन करीत आहेत. याला यश येत असून काही तासांतच तीन कोटी कर जमा झाला आहे.