शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

टॅक्सी चालकाचे अपहरण करून चाकूहल्ला

By admin | Updated: April 24, 2017 03:48 IST

प्रवासी बनून टॅक्सीत बसलेल्या तीन व्यक्तींनी टॅक्सी चालकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर चालकावर चाकूने हल्ला केल्याची घटना रविवारी

मुंबई : प्रवासी बनून टॅक्सीत बसलेल्या तीन व्यक्तींनी टॅक्सी चालकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर चालकावर चाकूने हल्ला केल्याची घटना रविवारी सकाळी पूर्व द्रुतगती मार्गावर घडली. याबाबत सायन पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे. मोहमद नसरुद्दीन कुरेशी (३५) असे या टॅक्सी चालकाचे नाव असून तो गोवंडीच्या शिवाजीनगर येथील राहणारा आहे. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे कुरेशी आपली टॅक्सी घेऊन घराबाहेर पडला. ठाण्यापर्यंत एका प्रवाशाला सोडल्यानंतर तीन हात नाका येथून ग्रॅण्ट रोडला जाण्यासाठी तीन प्रवासी त्याच्या टॅक्सीत बसले. पूर्व द्रुतगती मार्गावरून टॅक्सी विक्रोळी हायवेवर येताच आरोपींनी लघुशंकेचा बहाणा करत टॅक्सी थांबवली. याच दरम्यान या आरोपींनी चालकाला चाकूचा धाक दाखवत मागच्या सीटवर नेले, तर एका आरोपीने टॅक्सी सायनच्या दिशेने वळवली. टॅक्सीमध्ये दोन्ही आरोपींनी कुरेशी याला जबर मारहाण केली. त्यानंतर चाकूने त्याच्या हातावर, कानावर आणि पोटावर जबर वार केले. टॅक्सी चुन्नाभट्टी हायवेजवळ येताच आरोपी आणि टॅक्सी चालकामध्ये झटापट झाली. त्यामुळे टॅक्सी चालवत असलेल्या आरोपीचे टॅक्सीवरील नियंत्रण सुटले. टॅक्सी रस्त्यालगत असलेल्या दुभाजकावर धडकली. त्यामुळे घाबरलेल्या आरोपींनी टॅक्सी तेथेच सोडून घटनास्थळावरून पळ काढला. काही पादचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ कुरेशी याला बाहेर काढले. सायन रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ही बाब सायन पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कुरेशीची भेट घेतली. त्यानंतर त्याच्या तक्रारीवरून तीन अनोळखी व्यक्तींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)