शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

एसटी महामंडळाला सवलतींचा फटका

By admin | Updated: August 20, 2015 01:09 IST

विविध सामाजिक घटकांना एसटीच्या बस प्रवास भाड्यामध्ये सवलत दिली जाते. यात राज्य शासनाच्या आठ विभागांचा समावेश असून, त्यांच्याकडून सवलतींचे २0१४-१५ मधील तब्बल

मुंबई : विविध सामाजिक घटकांना एसटीच्या बस प्रवास भाड्यामध्ये सवलत दिली जाते. यात राज्य शासनाच्या आठ विभागांचा समावेश असून, त्यांच्याकडून सवलतींचे २0१४-१५ मधील तब्बल १ हजार ३४१ कोटी रुपये येणे बाकी आहे. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या एसटीला दुष्काळात तेरावा महिना भोगावा लागत आहे. यामध्ये सामाजिक न्याय आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभागाची सर्वाधिक सवलत मूल्य असल्याचे सांगण्यात आले. एसटीकडून २४ विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात सवलती देण्यात येतात. ही सवलत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, सामाजिक न्याय विभाग, महिला व बालकल्याण विभाग, माहिती व जनसंपर्क विभाग, सामान्य प्रशासन विभाग, आदिवासी विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभागांना देण्यात येते. या सवलती दिल्यानंतरही त्याची प्रतिपूर्ती कोणत्याच विभागाकडून अद्यापही करण्यात आलेली नाही. शासनाच्या आठही विभागांकडून २0१४-१५ मध्ये १ हजार ३४१ कोटी ५८ लाख ९६ हजार ३७४ रुपये सवलतीचे मूल्य देण्यात आलेले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. यात सामाजिक न्याय विभाग आघाडीवर असून, या विभागाकडून ६९८ कोटी ३0 लाख ५७ हजार २९६ रुपये एसटीला येणे बाकी आहे. त्यानंतर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा नंबर लागत असून, या विभागाकडून ४२२ कोटी ४६ लाख ९३ हजार ७३१ रुपये येणे असल्याचे सांगण्यात आले. तर उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडूनही २१८ कोटी २४ लाख ८७ हजार ३११ रुपये अद्याप आलेले नाहीत. गेल्या अनेक वर्षांत आठही विभागांकडून सवलतींच्या मूल्याची प्रतिपूर्ती करण्यात आलेली नसल्यानेच ही थकबाकी वाढत गेली आहे.