शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

तावडे, मुंडेंना धक्का

By admin | Updated: July 10, 2016 04:45 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रशियाला घेऊन जाणाऱ्या विमानाने शनिवारी रात्री मुंबईहून ‘टेकआॅफ’ केले आणि दिवसभर गुलदस्त्यात ठेवलेली मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाची यादी राजभवनातून बाहेर पडली.

- अतुल कुलकर्णी, मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रशियाला घेऊन जाणाऱ्या विमानाने शनिवारी रात्री मुंबईहून ‘टेकआॅफ’ केले आणि दिवसभर गुलदस्त्यात ठेवलेली मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाची यादी राजभवनातून बाहेर पडली. अपेक्षेप्रमाणे विनोद तावडे यांच्याकडील वैद्यकीय शिक्षण खाते काढून घेण्यात आले तर पंकजा मुंडे यांच्याकडील जलसंधारण आणि रोजगार हमी अशी दोन खाती काढून घेण्यात आली. नव्या बदलात एकनाथ खडसे यांच्याकडील महसूल खाते चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले असले तरी त्यांच्याकडील सहकार हे महत्त्वाचे खाते काढून घेतले आहे. तर कृषी खाते पांडुरंग फुंडकर यांना दिले आहे.फडणवीस सरकारची ‘फ्लॅगशिप स्कीम’ म्हणून जलयुक्त शिवार योजनेची व्यापक प्रसिद्धी केली गेली होती. मात्र जलसंधारणाची कामे आपणच केली असे विधान मुंडे यांनी केले होते. त्याचा फटका त्यांना बसला आहे. त्यांचे हे खाते बढती देण्यात आलेल्या राम शिंदे यांना मिळाले आहे. मुंडेंसह विनोद तावडे यांना डॉ. तात्याराव लहाने आणि जे. जे. मधील संपाचे प्रकरण काहीसे भोवले. त्यावर नाराजी दाखवत त्यांचे हे खाते काढले असले तरी त्यांना अल्पसंख्याक आणि औकाफ ही महत्त्वाची खाती दिली आहेत. वैद्यकीय शिक्षण खाते गिरीष महाजन यांना हवे होते. पण जलसंपदा सोडायचे नव्हते. त्यांच्या दोन्ही इच्छा या निमित्ताने पूर्ण झाल्या आहेत.गडकरींशी जवळीक असणाऱ्या सोलापूरचे सुभाष देशमुख यांना सहकार आणि पणन व वस्त्रोद्योग ही महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडील पर्यटन खाते जयकुमार रावल यांना देतानाच रोजगार हमी हे खातेही दिले आहे. महादेव जानकर यांना पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय ही खाती देण्यात आली आहेत तर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे उत्पादन शुल्क हे अतिरिक्त खाते देण्यात आले आहे. निलंग्याचे संभाजी पाटील निलंगेकर यांना प्रकाश मेहता यांच्याकडील कामगार कल्याण व कौशल्य विकास ही खाती देण्यात आली आहेत. आता मेहता यांच्याकडे फक्त गृहनिर्माण खाते उरले आहे.शेवटच्या क्षणी गृह राज्यमंत्रीपद देणार असे मान्य केल्यामुळे शिवसेना शपथविधीत सहभागी झाली होती. त्यानुसार शिवसेनेचे दीपक केसरकर यांना ग्रामीण विभागाचे गृह राज्यमंत्रीपद देऊ केले असले तरी त्यांच्याकडचे ग्रामविकास हे खाते काढून घेतले आहे. मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे खाते रवींद्र वायकर यांना दिले जाईल, असे सांगितले जात होते; पण तसे घडले नाही. दिवसभर गोपनीयतापंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्ताराबरोबरच फेरबदलही करून टाकले आहेत. त्याची कुणकूण लागल्यानेच अनेक मंत्री आपल्याकडची खाती सोडायला तयार नव्हती. त्यामुळेच रात्री उशिरापर्यंत यादी तयार असूनही जाहीर केली गेली नाही. रात्री १० च्या सुमारास यादी घेऊन मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव भीमनवार आणि केतन पाठक राज्यपालांकडे गेले. जोपर्यंत विमान उडत नाही तोपर्यंत यादी जाहीर करायची नाही अशा सूचना मुख्यमंत्री कार्यालयास होत्या. रात्री उशिरा खातेवाटपावरून राजी नाराजी सुरू झाली त्यावेळी मुख्यमंत्री पूर्णपणे रेंजच्या बाहेर होते आणि नितीन गडकरीही अमेरिकेच्या दिशेने निघून गेले होते. पुढचा पूर्ण आठवडा मुख्यमंत्री बाहेर आहेत. ते १६ जुलै रोजी मुंबईत येतील. १७ तारखेला विरोधकांचे चहापान आणि १८ जुलैपासून अधिवेशन सुरू होणार असल्याने मिळालेली खाती घेऊन मंत्र्यांना अधिवेशनाच्या तयारीला सामोरे जावे लागणार आहे.राज्यमंत्री मदन येरावार यांना अनेक महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत. ज्यात ऊर्जा, पर्यटन, अन्न व औषधी प्रशासन, सार्वजनिक बांधकाम, व सामान्य प्रशासन या खात्यांचा समावेश आहे. सेनेचे सुभाष देसाई यांना उद्योगासोबत खाणकाम हे खाते देण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळातील मंत्री व त्यांची खाती...मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस - सामान्य प्रशासन, नगर विकास, गृह,विधि व न्याय, बंदरे, माहिती व जनसंपर्क, रोजगार व स्वयंरोजगारकॅबिनेट मंत्रीचंद्रकांत पाटील - महसूल,मदत व पुनर्वसन,सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम सोडून)सुधीर मुनगंटीवार - वित्त आणि नियोजन, वनेविनोद तावडे - शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण,उच्च व तंत्र शिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य, अल्पसंख्याक विकास व औकाफप्रकाश मेहता - गृहनिर्माणपंकजा मुंडे - ग्रामविकास, महिला व बाल कल्याणविष्णु सवरा - आदिवासी विकासगिरीष बापट - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन, विधान कार्यगिरीष महाजन - जलसंपदा, वैद्यकीय शिक्षणदिवाकर रावते - परिवहन,खार विकाससुभाष देसाई - उद्योग, खाणकामपांडुरंग फुंडकर - कृषी व फलोद्यानरामदास कदम - पर्यावरणएकनाथ शिंदे - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रमासह)चंद्रशेखर बावनकुळे - ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, उत्पादन शुल्कबबनराव लोणीकर - पाणीपुरवठा आणि स्वच्छताडॉ. दीपक सावंत - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणराजकुमार बडोले - सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यराम शिंदे - जलसंधारण, राजशिष्टाचारजयकुमार रावल - रोजगार हमी, पर्यटनसुभाष देशमुख - सहकार,पणन व वस्त्रोद्योगमहादेव जानकर - पशुसंवर्धन, दुग्धोपादन, मत्सव्यवसायसंभाजी निलंगेकर - कामगार, भूकंप पुनर्वसन, कौशल्य विकास, माजी सैनिक कल्याणराज्यमंत्री दिलीप कांबळे - सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य,मदत व पुर्नवसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ विद्या ठाकूर - महिला व बालकल्याणविजय देशमुख - सार्वजनिक आरोग्य, परिवहन, कामगार,राज्य उत्पादन शुल्कसंजय राठोड - महसूलदादाजी भुसे - ग्रामीण विकासविजय शिवतारे - जलसंपदा, जलसंर्वधन, विधान कार्यदीपक केसरकर - गृह (ग्रामीण), वित्त, नियोजनराजे अम्ब्रीशराव अत्राम - वन, आदिवासी विकासरवींद्र वायकर - गृहनिर्माण,उच्च व तंत्रशिक्षणडॉ. रणजीत पाटील - गृह (शहरे), नगर विकास, विधी व न्याय विभाग, संसदीय कार्य, कौशल्य विकास आणि माजी सैनिकांचे कल्याणप्रवीण पोटे-पाटील - उद्योग आणि खाणकाम, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम(उपक्रम सोडून)गुलाबराव पाटील - सहकारअर्जुन खोतकर - वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, मत्स्योद्योगमदन येरावार - ऊर्जा, पर्यटन, अन्न व औषधी प्रशासन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), सामान्य प्रशासनसदाभाऊ खोत - कृषी, व फलोत्पादन व पणनरवींद्र चव्हाण - बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण