शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभराने घरच्या जेवणाची चव

By admin | Updated: April 14, 2016 01:32 IST

८७० कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत २७ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली. भुजबळ यांना

मुंबई : ८७० कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत २७ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली. भुजबळ यांना तब्बल महिनाभराने घरच्या जेवणाची चव चाखायला मिळणार आहे. घरचे जेवण मिळावे यासाठी भुजबळांनी अर्ज केला होता. तो विशेष सत्र न्यायाधीश न्या. पी. आर. भावके यांनी बुधवारी मंजूर केला. न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने ईडीने बुधवारी भुजबळ आणि पुतणे समीर यांना विशेष न्यायालयात हजर केले. ईडीचे वकील अ‍ॅड. हितेन वेणेगावकर यांनी या दोघांविरोधात केलेले आरोपपत्र दाखल करून घ्यावे व त्यानुसार पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू करावी, अशी विनंती न्या. भावकेंना केली. न्या. भावकेंनी या मागणीवरील सुनावणी २० एप्रिलपर्यंत तहकूब करत छगन भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत २७ एप्रिलपर्यंत वाढ केली. भुजबळ, कुटुंबियांना मोक्का लावा, अशी विनंती करणारा आम आदमी पार्टीच्या प्रीती मेनन यांनी केलेला अर्ज न्या. भावकेंनी फेटाळून लावले. १३ मार्चला भुजबळ यांना ईडीने अटक केली. त्यानंतर १७ एप्रिलला त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. त्यानुसार आर्थररोड कारागृहातील १२ नंबर सेलमध्य े(कसाब सेल) त्यांना बंद केले आहे. या सेलमध्ये बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी पीटर मुखजीर्ही बंद आहे. पीटरला न्यायालयाच्या मंजुरीने घरचे जेवण मिळते. आतापर्यंत आता न्यायालयाने परवानगी दिल्याने भुजबळांनाही घरचा डबा येणार आहे. त्यामुळे महिनाभराने त्यांना घरच्या जेवणाची चव चाखायला मिळणार आहे. मोक्का लावण्याची विनंती फेटाळलीमहाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोक्का लावा, अशी विनंती करणारा अर्ज आम आदमी पार्टीच्या प्रीती मेनन यांनी केला होता. या प्रकरणातील साक्षीदारांना संरक्षण पुरवा असेही त्यांनी म्हटले होते. तो अर्ज न्या. भावकेंनी फेटाळून लावले.