शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

टीएमटीमध्ये टीसीच होत आहेत टार्गेट

By admin | Updated: August 23, 2016 03:54 IST

एकीकडे टीएमटीच्या प्रवाशांना अजूनही पुरेशा बस नाहीत.

जितेंद्र कालेकर,

ठाणे- एकीकडे टीएमटीच्या प्रवाशांना अजूनही पुरेशा बस नाहीत. अनेक बस दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच तिकीट तपासनिसांना विनातिकीट जाणाऱ्या दररोज १० प्रवाशांना पकडण्याचे टार्गेट दिले आहे. बेस्ट उपक्रमातही टीसींना अशा प्रकारचे ‘टार्गेट’ दिलेले नसताना टीएमटीकडून मात्र टीसींना ‘लक्ष्य’ केल्याने तीव्र नाराजी पसरली आहे.टीएमटीतील सर्व सहायक वाहतूक निरीक्षकांना रोज किमान १० विनातिकीट प्रवाशांना पकडण्याचे फर्मान काढले आहे. तसेच त्यांनी किमान पाच वाहकांच्या बॅगा तपासणी करून हिशेब पडताळणी करावी, पाच जणांच्या रकमेची तपासणी करावी, बसमधील मेमोप्रमाणे प्रवासी तिकिटे तपासणीची २४ उद्दिष्टे दिली आहेत. मुळात, पूर्वीच्या प्रमाणात आता कोणीही विनातिकीट जाण्यास धजावत नाही. हे अधिकाऱ्यांच्या तपासणीतही उघड झाले होते. वेळेअभावी रक्कम तपासणीही होत नाही. एका वाहकाची बॅग तपासणीसाठी किमान अर्धा तास लागतो. अपुऱ्या बसमुळे जास्त वेळ थांबवणे शक्य होत नाही. त्यामुळे टार्गेट पूर्ण न करणाऱ्या जवळपास सर्वच सहायक वाहतूक निरीक्षकांना परिवहन व्यवस्थापक सुधीर राऊत यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. क्षुल्लक कारणावरून कारणे दाखवा नोटीस देणे, वेतनवाढ रोखणे, या कारणांमुळे टीसी हैराण झाले असून ते तणावग्रस्त असल्याची भावना अनेकांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली. ।बेस्टच्या सेवेतील तिकीट तपासनिसांना विनातिकीट प्रवाशांकडून दंड वसूल करणे सक्तीचे आहे. मात्र, प्रत्येक दिवशी किंवा महिन्याला मासिक दंड किती वसूल करावा, असा नियम प्रशासनाने केला नाही. तसेच त्यांना ठरावीक दंडवसुलीही दिलेली नसल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. शिवाय, दिवसाला किती प्रवाशांकडून दंड वसूल करावा, याचेही उद्दिष्ट नाही. मग, टीएमटीमध्येच तिकीट तपासनिसांकरिता हा दुजाभाव कशासाठी? मुळात सहायक वाहतूक निरीक्षकांना तिकीट तपासणीसह बस वेळेत सोडणे, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे, अपघात झाल्यानंतर प्रवाशांना रुग्णालयात नेणे, पोलीस प्रक्रियेचा पाठपुरावा करणे, अशा ४० ते ४५ वेगवेगळ्या कामांचा समावेश असतो. तरीही, ठरावीक दंडवसुलीची सक्ती केल्याने टीएमटीच्या या टीसींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.