शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

भूमाफियांचे लक्ष्य १४ गावे

By admin | Updated: April 27, 2016 03:06 IST

महापालिकेमधून वगळण्यात आलेल्या १४ गाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होऊ लागले आहे.

नामदेव मोरे,

नवी मुंबई-महापालिकेमधून वगळण्यात आलेल्या १४ गाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होऊ लागले आहे. नियंत्रण ठेवण्यासाठी शासकीय यंत्रणाच नसल्याने वन विभागाच्या जमिनीवर भंगार गोडाऊनसह अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस शासकीय यंत्रणाच नसल्याने दिवसेंदिवस या परिसरातील स्थिती गंभीर होऊ लागली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमधून शिळफाटा परिसरातील १४ गावे वगळण्यात आली आहेत. ही गावे कोणत्या महापालिकेमध्ये वर्ग करायची, याविषयी चर्चा सुरू आहे. नवी मुंबई, ठाणे की कल्याण पालिकेत त्यांचा समावेश करायचा, हे अद्याप निश्चित झालेले नाही. झपाट्याने शहरीकरण झालेल्या या विभागातील नागरी सुविधांसाठी ठोस यंत्रणा नाही. शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचा गैरफायदा भूमाफिया घेऊ लागले आहेत. १० वर्षांमध्ये या परिसरामध्ये प्रचंड अतिक्रमण झाले आहे. शिळफाटा ते तळोजा रोडच्या बाजूला भंगारची गोडाऊन उभारण्यात आली आहेत. याशिवाय इतरही व्यवसाय सुरू झाले आहेत. यामधील बहुतांश अनधिकृत आहेत. वन विभागाच्या जमिनी बळकावण्यात आल्या आहेत. पूर्वी फक्त व्यावसायिक अतिक्रमण झाले होते. आता झोपड्या व इमारतीही उभ्या राहू लागल्या आहेत. अतिक्रमण रोखायचे कोणी व कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. येथे अवैध व्यवसाय करणारांचे प्रमाणही वाढले आहे. हॉटेल, लॉजची संख्या झपाट्याने वाढत आहे. डोंगरावरही झोपड्या बांधण्याचे काम सुरू झाले आहे. अशीच स्थिती राहिली तर धारावीपेक्षा मोठी झोपडपट्टी व अनधिकृत साम्राज्य या परिसरात उभे राहील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. चौदा गावांच्या सीमेवर असलेल्या नवी मुंबई महापालिकेमधील अडवली भुतावली गावच्या परिसरामध्ये ३५५ हेक्टर वनजमीन आहे. यामधील काही जमीन मोठ्या व्यावसायिकांनी खरेदी केली असून, उर्वरित जमिनीवर झोपड्यांचे बांधकाम सुरू झाले आहे. १४ गावांच्या परिसरातील बोरीवली गावच्या हद्दीमध्येच तब्बल ५१३ हेक्टर वनजमीन आहे. परंतु या जमिनीचे रक्षण करण्यासाठीही कोणतीच यंत्रणा नाही. सद्य:स्थितीमध्ये ठाणे, नवी मुंबईमधील अनधिकृत बांधकामांवर वेगाने कारवाई सुरू झाली आहे. अनेक भूमाफियांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे येथे अतिक्रमण करणारांचे धाबे दणाणले असून, महापालिकेच्या कार्यक्षेत्राबाहेर अतिक्रमण करण्यास प्राधान्य मिळू लागले आहे. भविष्यात शिळफाटा परिसर हा ठाणे, नवी मुंबई विभागातील सर्वात महत्त्वाचा विभाग असणार आहे. याच परिसरात सद्य:स्थितीमध्ये विकासासाठी जमीन उपलब्ध आहे. परंतु शासनाने वेळेत अतिक्रमण थांबविले नाही तर भविष्यात त्यांचे दुष्परिणाम आजूबाजूच्या महापालिकांनाही भोगावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याविषयी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी माहिती संकलित करून न्यायालयात धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे.