शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तारापूरचे बंद केलेले ३ मोठे उद्योग पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2016 02:48 IST

अटी व बंधने पायदळी तुडवून प्रदूषण केल्यामुळे बंद करण्यात आलेल्या तीन बड्या कारखान्यांकडून बँक गॅरंटी घेऊन ते पुन्हा सुरू करण्यात आल्याने नागरिकांत नाराजी पसरली

पंकज राऊत,

बोईसर- पर्यावरणासंदर्भातील नियम, अटी व बंधने पायदळी तुडवून प्रदूषण केल्यामुळे बंद करण्यात आलेल्या तीन बड्या कारखान्यांकडून बँक गॅरंटी घेऊन ते पुन्हा सुरू करण्यात आल्याने नागरिकांत नाराजी पसरली आहे. या कारखान्यांचा वीज आणि पाणीपुरवठा तातडीने सुरु करण्यात आला आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील तीन मोठे कारखाने आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवडयांत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंद करून त्या कारखान्यांचा वीज व पाणी पुरवठा खंडित केला होता मात्र अवघ्या काही दिवसातच पर्यावरणासंदर्भात अटी व बँक गॅरंटी घेऊन कारवाई मागे घेण्यांत आली असून तीन कारखान्यांचा पाणी पुरवठा तर दोघांचा वीज पुरवठाही पूर्ववत सुरू करण्यात आला आहे तर ही कारवाई म्हणजे दिखाऊ व एक फार्स असल्याचा आरोप भुमिपूत्रांनी केला आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रामधील बॉम्बे रेयॉन, मुद्रा लाईफ स्टाईल व रेसोनन्स या तीन नामांकित उद्योगावर बंदची कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी देवून उद्योगांचा पाणी व वीज पुरवठाही खंडित करण्याचे पत्रही एमआयडीसी व महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले होते मात्र या दोन्ही विभागाकडून पाणी व वीज पुरवठा खंडीत करण्यास टाळाटाळ करण्यात येत होती.विशेष गंभिर बाब म्हणजे एका बाजुला म.प्र.नि. मंडळ पाणी पूरवठा खंडीत करण्याचे पत्र एमआयडीसीच्या पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता नंदकुमार करवा यांना पाठविल्यानंतर म.प्र.नि. मंडळाच्या तारापूर एक या विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे यांनी करवा यांना मोबाईलवर प्रादेशिक अधिकारी ठाणे यांनी सांगितल्या प्रमाणे बाँम्बे रेयॉन व रेसोनन्स या उद्योगांचा पणी पूरवठा खंडित करू नका असा संदेश पाठविला होता तर या संदर्भात शिवसेनेचे धोडी व संखे यांनी संबधित अधिकाऱ्यांना कारवाई संदर्भात जाब विचारून कारवाईची मागणी केली होती. अखेर २४ आॅक्टोबरला तिन्ही उद्योगांचा पाणी तर २५ आॅक्टोबरला वीज पुरवठा खंडित केला. दोन्ही कारवाईसाठी एमआयडीसी च्या पाणी पुरवठा विभागाच्या आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वेळकाढू धोरण अवलंबिले होते. मात्र २७ आॅक्टोबर बाँम्बे रेयॉनला पुन्हा उद्योग सुरू करण्याचे पत्र म.प्र.नि. मंडळाने दिल्यानंतर २८ आॅक्टोबरला सकाळी त्वरीत पाणी पुरवठा सुरू करण्यांत आला.मुद्रा लाईफ स्टाईल व रेसोनन्सचा पाणीपुरवठा म.प्र.नि. कडून पत्र मिळाले त्याच दिवशी म्हणजे २८ आॅक्टोबरला पाणी पुरवठा सुरू करण्याची तत्परता पाणी पुरवठा विभागाने दाखविली. तर रेसोनन्स व मुद्रा लाईफ स्टाईल वीज पुरवठा तत्परतेने सुरू करण्यात आला मात्र दिवाळीच्या सुट्टीमुळे बाँम्बे रेयॉन रीकनेक्शन चार्जेस भरू न शकल्याने तिचा वीज पुरवठा सुरू झाला नसला तरी तोही लवकरच सुरू होईल.>स्थानिक म्हणतात कारवाईचा केला फार्सहे तीन मोठे कारखाने आॅक्टोबरच्या शेवटास प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंद करून त्यांंचा वीज व पाणी पुरवठा खंडित केला होता मात्र अवघ्या काही दिवसातच पर्यावरण संवर्धनाच्या अटी लादून बँक गॅरंटी घेण्यात आली त्याबदल्यात कारवाई मागे घेण्यांत आली असून तिघांचा पाणी पुरवठा तर दोघांचा वीज पुरवठाही सुरू करण्यात आला आहे तर ही कारवाई म्हणजे दिखाऊ व एक फार्स असल्याचा आरोप भूमिपुत्रांनी केला आहे.