शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

तपोवन एक्स्प्रेसमध्ये तरुणाचे विकृत चाळे

By admin | Updated: July 13, 2017 05:35 IST

बोरीवलीपाठोपाठ तपोवन एक्स्प्रेसमध्येही तरुणीला पाहून हस्तमैथुन करण्याचा प्रकार घडला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बोरीवलीपाठोपाठ तपोवन एक्स्प्रेसमध्येही तरुणीला पाहून हस्तमैथुन करण्याचा प्रकार घडला. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. तब्बल १३ दिवसांनंतर या प्रकरणाला सोशल मीडियातून वाचा फोडण्यात आली. हा व्हिडीओ रेल्वे पोलिसांच्या निदर्शनात येताच, अवघ्या सहा तासांत त्यांनी अशोक प्रधान (२०) या विकृत तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. सीएसटीएम स्थानकांवर २९ जून रोजी पहाटे ५.४५ वाजता तक्रारदार तरुणी मैत्रिणीसह तपोवन एक्स्प्रेसमधून प्रवास करणार होती. ट्रेन सुटण्यास अवधी असल्याने फलाटावर कोणीही प्रवासी नव्हते. मैत्रिणीची वाट बघत ती एकटीच फलाटावर थांबली. याच संधीचा फायदा घेत, अशोकने अश्लील चाळे करत, हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर, तरुणीने दुसरीकडे पळ काढला. मात्र,तेथेही अशोकची विकृती सुरू होती. तरुणीने पोलिसांकडे मदत मागितली. मात्र, पोलिसांनीही तिला मदत करण्याऐवजी दुसरीकडे बसण्याचा सल्ला दिला. तरुणीने हा सारा प्रकार मोबाइलमध्ये कैद केला. बुधवारी तब्बल १३ दिवसांनंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. सर्व स्तरांतून त्याचे तीव्र पडसाद उमटले. या व्हिडीओची दखल घेत, रेल्वेचे अपर पोलीस महासंचालक जय जीत सिंह यांनी संबंधितांना तपासाचे आदेश दिले. व्हिडीओमुळे जाग आलेल्या तपास यंत्रणेने स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात सुरुवात केली. त्यातून अशोकची माहिती समोर येताच, त्याला अवघ्या सहा तासांत बेड्या ठोकण्यात आल्या. अशोकला विनयभंग आणि गैरवर्तनप्रकरणी अटक केली. मूळचा ओरिसामधील भुवनेश्वरचा रहिवासी असलेला अशोक चेंबूरच्या माहूल गावात राहतोे. या प्रकरणी सीएसटीएम लोहमार्ग पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती सीएसटीएम लोहमार्ग पोलिसांनी दिली.>पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी होणारतरुणाचे हे वागणे लज्जास्पद आहे. या घटनेवर रेल्वे सुरश्रा बल आणि रेल्वे पोलीस दल या दोन्हींकडून जलद कृती करणे अपेक्षित आहे. तरुणीच्या तक्रारीवरून, तसेच व्हिडीओच्या मदतीने संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येईल. दोषी आढळल्यास, त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.- जय जीत सिंह, अपर पोलीस महासंचालक, रेल्वे पोलीस