शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
4
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
5
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
6
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
7
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
8
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
9
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
10
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
11
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
12
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
13
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
14
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
15
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
16
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
19
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
20
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा

तन्मय भटवर गुन्हा दाखल

By admin | Updated: May 31, 2016 06:19 IST

भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर एआयबी रोस्टचा विनोदवीर तन्मय भटने केलेल्या आक्षेपार्ह शेरेबाजीविरोधात सर्व स्तरातून टीकेची झोड उठली आहे

मुंबई : भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर एआयबी रोस्टचा विनोदवीर तन्मय भटने केलेल्या आक्षेपार्ह शेरेबाजीविरोधात सर्व स्तरातून टीकेची झोड उठली आहे. याविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात मनसेकडून तक्रार दाखल होताच विशेष शाखेने याचा तपास सुरू केला आहे. यूट््युब आणि फेसबुकवरून हा व्हिडीओ काढून टाकण्यासाठी सायबर सेलने गुगलकडे अर्ज केला आहे. पोलीस सूत्रांकडून तन्मय भटला अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बॉलीवूडकरांसह मनसे आणि शिवसेना या राजकीय पक्षांनीही तन्मयचा निषेध व्यक्त केला. तसेच त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली गेली. या तक्रारीनंतर सायबर सेलने या प्रकरणी कारवाईस सुरुवात केली आहे. तन्मयचा व्हिडीओ काढून टाकण्यासाठी गुगल, फेसबुक आणि यूट्युबशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती सायबर सेलचे सहायक पोलीस आयुक्त यशवंत पाठक यांनी दिली आहे. याशिवाय, व्हिडीओ टाकण्यासाठी वापरण्यात आलेल्या सिस्टीमचा आयपी शोधण्याचेही काम सुरू असल्याचे ते म्हणाले. तसेच या व्हिडीओची ट्रान्सस्क्रिप्ट काढून त्यावर विधि तज्ज्ञांचे मत घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते संग्रामसिंग निशाणदार यांनी दिली.दरम्यान, सचिन आणि लतादीदींवर आक्षेपार्ह शेरेबाजी करणाऱ्या तन्मय भटला ठोकून काढण्याची धमकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिली आहे. तन्मय भट जिथे दिसेल तेथे मनसेचे कार्यकर्ते ‘मनसे स्टाईल’ने त्याला उत्तर देतील, असे मनसे चित्रपटसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सांगितले. त्यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तन्मयविरोधात तक्रार दाखल केली असून, त्याच्या अटकेची मागणी केली आहे. त्यामुळे तन्मय भटच्या अटकेची शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी) तन्मय भटची मुजोरी कायम...भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर अश्लाघ्य टिप्पणी करणाऱ्या एआयबीच्या तन्मय भटची मुजोरी कायम आहे. तन्मय भटविरोधात पोलिसात तक्रार दाखल झाली असतानाही, त्याने माफी न मागता आपल्या व्हिडीओचे समर्थन केले आहे. याबाबत त्याने ट्विट करून आपली भूमिका योग्य असल्याचे एक प्रकारे दाखवले आहे. माझ्या व्हिडीओवर सगळे जण असे काही तुटून पडले आहेत, जसे काही प्रत्येकाने आतापर्यंत सभ्य जोकच ऐकवले आहेत, असे टिष्ट्वट तन्मयने केलेय. बॉलीवूडकरांकडूनही खंत...च्विनोदाच्या नावाखाली लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांची थट्टा करणारा हा प्रकार सहन केला जाणार नाही, अशा शब्दांत बॉलीवूडकरांनी टीका केली आहे. च्सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून मी नऊ वेळा पुरस्कार घेतला आहे आणि मला विनोदाची चांगलीच जाण आहे. मात्र एआयबीच्या या नव्या प्रकाराला विनोद म्हणता येणार नाही, अशा शब्दांत टीका करत लतादीदी आणि सचिनचा अनादर करण्याचा हा प्रकार असल्याचे अभिनेता अनुपम खेर यांनी म्हटले आहे. च्तर अशा प्रकारे कुणाचा अनादर करणे याला गंमत किंवा विनोद म्हटले जाऊ शकत नाही. हा अतिशय धक्कादायक प्रकार असल्याची टीका रितेश देशमुखने केली आहे. सेलिना जेटली या अभिनेत्रीनेही हा वाईट प्रकार असून, या प्रकरणी एआयबीने लता मंगेशकर यांची माफी मागितलीच पाहिजे, असे म्हटले आहे.>सर्वपक्षीय आक्रमकदुसरीकडे तन्मय भटच्या आक्षेपार्ह व्हिडीओविरोधात सर्वपक्षीयांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणी मनसेने मुंबईच्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. तर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे निवेदन करत, तन्मयवर कडक कारवाईची मागणी केली आहे. याशिवाय मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनीही तन्मय भटविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. लतादीदी मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर या दोन ‘भारतरत्न’ आणि संगीत - क्रिकेट क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्वांवर तन्मय भट आणि एआयबीच्या टीमने कुचेष्टापर व्हिडीओ तयार करून सामाजिक माध्यमात प्रस्तुत केला आहे.