शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नारळ वाढवण्यासाठी टँकर ताटकळले!

By admin | Updated: May 5, 2016 01:39 IST

आठवडाभरापासून बहुप्रतिक्षित असलेले टँकर अखेर बुधवारी शहरात दाखल झाले खरे; मात्र नारळ वाढवून (फोडून) पाणी टँकरमध्ये भरण्याच्या अट्टहासापोटी दोन तास टँकर तलावातच

- चेतन धनुरे , उदगीर (जि. लातूर)

आठवडाभरापासून बहुप्रतिक्षित असलेले टँकर अखेर बुधवारी शहरात दाखल झाले खरे; मात्र नारळ वाढवून (फोडून) पाणी टँकरमध्ये भरण्याच्या अट्टहासापोटी दोन तास टँकर तलावातच ताटकळले़ परिणामी सहा टँकरची प्रत्येकी एक खेप कमी झाली़ म्हणजेच तब्बल १ लाख ४० हजार लिटर्स पाणी आणता आले नाही़उदगीरमध्ये घेतलेल्या बैैठकीत जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी शहरासाठी १० टँकरने दररोज १० लाख लिटर्स पाणी वागदरीतून आणण्याचा निर्णय जाहीर केला़ बुधवारच्या मुहूर्ताला पहाटे नांदेड व लातूरहून प्रत्येकी ३ टँकर दाखल झाले़ सकाळी वागदरीच्या तलावात सहा टँकर तलावावर पोहोचले़ यंत्रणा तयार होती़ विद्युतपुरवठाही ८ वाजेपासूनच सुरू करण्यात आला होता़नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, उपजिल्हाधिकारी व तहसीलदार तलावावर येणार असल्याची चर्चा सुरू झाली़ त्यांच्या उपस्थितीत नारळ वाढवून व कळ दाबून पाणी भरण्यास सुरुवात होईल, या प्रतिक्षेत तासभर टँकर थांबून राहिले़ मान्यवरांना वेळ लागत असल्याने तलावावरील अभियंत्यांनी ते येईपर्यंत टँकर भरुन घेता येईल, या विचाराने १०़०३ वाजता पहिला टँकर भरण्यासाठी फिलिंग पॉर्इंटवर लावला. १०़३४ वाजेपर्यंत ४ टँकर भरले़ तेवढ्यात नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे आले़ त्यांनी नारळ वाढवला. या संपूर्ण प्रक्रियेअंती ११़१६ वाजता पहिला टँकर बाहेर पडला़ या सहा टँकरद्वारे एकूण १ लाख ४० हजार लिटर्स पाणी बनशेळकीच्या फिल्टर आणण्यात आले़