शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

टँकर लॉबीमुळे दुष्काळ!

By admin | Updated: April 19, 2016 04:33 IST

लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात मिळून ६५०० टँकर चालत आहेत. या टँकर्सना कोठून पाणी मिळते, असा सवाल करत राजकारण्यांच्या ताब्यातील टँकर आणि छावण्या लॉबीनेच

मुंबई : लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात मिळून ६५०० टँकर चालत आहेत. या टँकर्सना कोठून पाणी मिळते, असा सवाल करत राजकारण्यांच्या ताब्यातील टँकर आणि छावण्या लॉबीनेच दुष्काळ तीव्र केल्याचा आरोप महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत केला. लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जे काम १५ दिवसांत पूर्ण केले, तेच काम तेथील राजकीय नेत्यांना एवढ्या वर्षांत का शक्य झाले नाही, असा सवाल करत खडसेंनी लातूरच्या तत्कालीन नेतृत्वाकडे अंगुलीनिर्देश केला. ते म्हणाले, लातूरपासून जवळच असणाऱ्या निम्म तेरणा धरणात पाणी आहे. ते पाणी तेथून लातूरला नेण्यासाठी बेलकुंड येथील फिल्ट्रेशन प्लॅन्ट चालू करणे आवश्यक होते. पण गेली अनेक वर्षे तो बंद पडून होता. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्याकडून ही माहिती मिळताच आपण विशेष बाब म्हणून २ कोटी रुपये मंजूर केले. (विशेष प्रतिनिधी)लातूर महापालिकेच्या उपायुक्तांकडे बेलकुंडच्या फिल्ट्रेशन प्लॅन्टसाठी ब्लिचिंग पावडरची मागणी करण्यात आली होती; मात्र प्लॅन्ट लातूर महापालिकेच्या हद्दीत नाही, त्यामुळे आम्हाला पावडर देता येणार नाही, असे सांगून पावडर देण्यास उपायुक्तांनी नकार दिला होता, असेही खडसे यांनी सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक : २४ तासांच्या लाइनसाठी महावितरणला ३० लाख रुपये दिले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी अवघ्या १५ दिवसांत तो प्लॅण्ट चालू केला. आज तेरणातून ५० लाख लीटर व मिरजेहून जलदूत रेल्वेद्वारे ५० लाख लीटर पाणी सुरू झाले आहे. जळकोटजवळून तीन दिवसांनी एकदा १५ ते १६ लाख लीटर पाणी मिळेल अशी व्यवस्था लवकरच सुरू होत आहे, असेही खडसेंनी सांगितले.