शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तान्हुलीला दूध पाजताना काळाने घातला घाला

By admin | Updated: July 13, 2017 02:03 IST

तान्ह्या बाळाला दूध पाजताना एका आदिवासी महिलेला सर्पाने दंश केला.

गौरी टेंबकर-कलगुटकर लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तान्ह्या बाळाला दूध पाजताना एका आदिवासी महिलेला सर्पाने दंश केला. मंगळवारी दुपारी हा प्रकार आरे कॉलनीत घडला. मात्र, रुग्णालयाअभावी वेळीच योग्य उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याने, या परिसरात संतापाचे वातावरण आहे. यशोदा रमेश कडू (१९) असे या मयत आदिवासी महिलेचे नाव आहे. यशोदा या गोरेगाव पूर्व परिसरात आरे कॉलनीच्या युनिट क्रमांक २९ मध्ये राहत होत्या. स्थानिक रहिवासी असलेल्या समाजसेविका पूनम गायकवाड यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, यशोदा या दुपारी दीडच्या सुमारास त्यांच्या सात महिन्यांच्या बाळाला (मुलीला) दूध पाजत होत्या. त्या वेळी त्यांच्या पाठीला सापाने एकदा नव्हे, तर तीन वेळा दंश केला. मात्र, तेव्हा त्यांना ते समजले नाही. काही वेळाने त्यांच्या पाठीला वेदना जाणवू लागल्या. तेव्हा त्यांनी शेजारी जाऊन याबाबत सांगितले. शेजाऱ्यांनीच त्यांना सापाने दंश केल्याचे सांगितले, तसेच डॉक्टरकडे नेण्यासाठी पळापळ सुरू केली. मात्र, आरेमध्ये जवळपास कुठेही रुग्णालय नसल्याने, त्यांना आणि बाळाला जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरने त्यांना तपासून मृत घोषित केले.दोन महिन्यांपूर्वी गायकवाड यांच्या मुलाचा कुत्र्याने चावा घेतला, तेव्हादेखील रुग्णालयाअभावी ट्रॉमा केअर आणि नंतर कूपर रुग्णालयात त्यांच्या मुलाला हलवावे लागले, ज्यामुळे त्याची स्थितीही गंभीर झाली होती. मंगळवारी उशिरा रात्री यशोदा यांचा मृतदेह त्यांच्या घरी आणण्यात आला, ज्यावर आरे चेकनाका परिसरात असलेल्या स्मशानात अंत्यसंस्कार करण्यात आले. यशोदा आणि तिचा नवरा अनाथ असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यातच या घटनेने सात महिन्यांच्या तान्हुलीची मायेची सावलीदेखील कायमची हिरावून घेतली. विज्ञान आणि मेडिकल इतके प्रगत असतानाही, मुंबईसारख्या शहरात साप चावून व्यक्ती मरावी, ही शोकांतिका आहे.मात्र, आदिवासींच्या हक्कांसाठी अजूनही स्थानिक नेत्यांकडून आवश्यक ते प्रयत्न केले जात नसल्याचे चित्र आहे. एकंदर या घटनेमुळे आरे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.>बाळाची मृत्यूशी झुंज?यशोदा यांना साप चावला, तेव्हा त्या बाळाला दूध पाजत होत्या. त्यामुळे बाळालाही विषबाधा झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याच कारणास्तव त्याला चोवीस तासांसाठी ट्रॉमा केअर रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.घराशेजारीच सापाचे बीळ!यशोदा यांना सापाने चावल्याचे समजताच, स्थानिकांनी सापाला सर्वत्र शोधण्यास सुरुवात केली. त्यासाठी सर्पमित्रालादेखील बोलाविण्यात आले. त्याने सापाला शोधून बाहेर काढले. यशोदा यांच्या घराशेजारीच त्या सापाचे बीळ त्यांना सापडले. या घटनेमुळे इतकी चीड स्थानिकांच्या मनात होती की, सापाला बाहेर काढून घेऊन जाणाऱ्या सर्पमित्राला स्थानिकांनी अडविले. त्यानंतर, त्याच्याकडचा साप खेचून घेऊन त्याला ठेचून मारले. आरे रुग्णालयात सुविधांचा अभावआरेमध्ये युनिट क्रमांक १६ जवळ ‘आरे रुग्णालय’ नावाचे इस्पितळ उघडण्यात आले आहे. मात्र, त्यात योग्य सुविधा उपलब्ध नाहीत, तसेच सर्पदंश किंवा कुत्र्याने चावा घेतल्यास आवश्यक असलेली इंजेक्शन्सदेखील या ठिकाणी उपलब्ध नाहीत. त्यामुळे ट्रॉमा केअर रुग्णालयाशिवाय स्थानिकांकडे दुसरा पर्यायच नाही.