शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

थर्टी फर्स्टच्या रात्री तळीरामांना टॅक्सीत बसवा

By admin | Updated: December 28, 2015 04:23 IST

नवीन वर्षाचे स्वागत करताना बेभान होऊन वाहन चालवणाऱ्या ‘तळीराम’चालकांमुळे अपघाताला सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. याविरोधात वाहतूक पोलिसांकडून नेहमीच कारवाई केली जाते.

मुंबई : नवीन वर्षाचे स्वागत करताना बेभान होऊन वाहन चालवणाऱ्या ‘तळीराम’चालकांमुळे अपघाताला सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. याविरोधात वाहतूक पोलिसांकडून नेहमीच कारवाई केली जाते. मात्र ही कारवाई करतानाच बार अ‍ॅण्ड रेस्टॉरेंट चालकांनाही यासंदर्भात वाहतूक पोलिसांकडून महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तळीराम ग्राहकाला टॅक्सी सेवा पुरवण्यात यावी किंवा त्याचे स्वत:चे वाहन असल्यास चालक देण्यात यावा, अशा सूचना करण्यात आल्या असून त्यामुळे अपघात होणार नाही, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. नवीन वर्षाचे स्वागत करताना ‘तळीराम’चालकांचा बेभान आणि बेधुंदपणा नेहमीच दिसून येतो. त्यांच्या बेभानपणामुळे अपघातांनाही सामोरे जावे लागते. हे पाहता मुंबई वाहतूक पोलिसांनी तळीरामांना रोखण्यासाठी या वेळी चांगलीच कंबर कसली आहे. जादा वाहतूक पोलिसांची कुमक तैनात करताना पेट्रोलिंग करणाऱ्यांवर अधिक भर देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी नवीन वर्षाचे स्वागत करताना ५२३ तळीराम चालकांवर कारवाई करण्यात आली होती. यामध्ये तब्बल ३७0 दुचाकीस्वारांचा समावेश होता, तर १४३ कारचालक होते आणि सहा रिक्षा चालक होते. या तळीराम चालकांना रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी बार अँड रेस्टॉरन्ट चालकांना काही सूचना केल्या आहेत. या बाबत वाहतूक सहपोलीस आयुक्त मिलिंद भारांबे म्हणाले की, ‘नशेत असणाऱ्या ग्राहकाकडे वाहन असल्यास त्याला चालक उपलब्ध करून देण्यात यावा. एखाद्याकडे वाहन नसल्यास टॅक्सीसेवा देण्यात यावी, असे समन्स असणारे पत्र देण्यात आले आहे. जेणेकरून कोणताही गुन्हा त्यांच्याकडून घडणार नाही आणि वाहतूक पोलिसांनाही मदत होईल. त्याचप्रमाणे मुंबई शहर व उपनगरातील ९0 ठिकाणी नाकाबंदी करतानाच अचानक भेटही देऊन तपासणी करण्यात येणार आहे,’ असेही त्यांनी सांगितले. या कामांसाठी जवळपास दोन हजार वाहतूक पोलीस कार्यरत राहतील.