शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांच्या संपाने विद्यार्थी, शेतकऱ्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2016 04:21 IST

महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघातर्फे बेमुदत संप आजपासून सुरू केल्यामुळे तलाठी कार्यालये बंद होती.

डहाणू / मनोर : पालघर तालुक्यात तसेच जिल्ह्यात विविध प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघातर्फे बेमुदत संप आजपासून सुरू केल्यामुळे तलाठी कार्यालये बंद होती. त्यामुळे शेतकरी शाळकरी मुले ग्रामस्थांची तलाठी सजा अंतर्गत कागदपत्रासाठी प्रचंड हाल सुरू झाले आहेत.पालघर जिल्ह्यात एकूण १८४ तलाठी कार्यालय (सजा) आहेत त्यापैकी ४० रिक्त पदामुळे १४३ तलाठी व ३२ मंडळ अधिकारी आजपासून बेमुदत संपावर गेले. १) तलाठी सजांची व महसूल मंडळांची पुनर्रचना करणे, मंडळ अधिकारी कार्यालयचे भाडे देणे २) ७/१२ संगणकीकरण व ई-फेरफार मधील सॉफ्टवेअर दुरूस्ती सर्व्हरची स्पीड नेट कनिक्टीव्हीटी या अडचणी दूर करणे ३) तलाठी मंडळ अधिकारी यांना पायाभूत प्रशिक्षण देणे ४) अवैध गौण खनिज वसूलीच्या कामातून तलाठी संवर्गास वगळणे, ५) तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना कार्यालय बांधून देणे अशा विविध मागण्यांसाठी दि. ११ एप्रिल रोजी काळ्या फिती लावून काम केले. त्यानंतर १६ एप्रिल निदर्शने करण्यात आली. २० एप्रिल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले गेले. २१ एप्रिल रोजी संगणीकृत कामकाजावर बहिष्कार टाकला तरी सुद्धा शासनाला जाग आली नाही व एकही मागणी पूर्ण न केल्याने संघटनेने आज २६ एप्रिल २०१६ पासून बेमुदत संप पुकारला आहे.परिक्षा संपत आल्या असून त्यांना नवीन अ‍ॅडमीशनसाठी लागणारे व तलाठ्यांकडून मिळणारे कागदोपत्र आता घ्यायचे कुणाकडून हा प्रश्न पडला आहे. खरीप हंगामासाठी सोसायट्याकडून कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना आतापासूनच कागदोपत्राची जमवाजमव करावी लागते परंतु तलाठी कार्यालये बंद असल्यामुळे त्यांचीही मोठी पंचायत होणार आहे.संघटनेचे जिल्हाध्यक्ष केशव तरांगे, तालुकाध्यक्ष सी. रेखा म्हात्रे, चिटणीस हितेश राऊत, उपाध्यक्ष उज्वला पाटील, तेजल पाटील, अजीत शेलार, सदानंद भोईर, रत्नदिप दळवी, चुरी तसेच सर्व तलाठी सहभागी झाले होते. (वार्ताहर)